लाच घेताना पकडले Media Gallery
नांदेड

बिलोली तहसीलमधील कारकूनाला दोन हजार रुपये घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा

बिलोली (जि.नांदेड) - बिलोली (Biloli) येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून धोडिंबा कोकाटे यास दोन हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (ता. १५) पकडण्यात आले. तक्रारदार आणि त्याच्या भावाच्या मालमत्तेच्या वादात बिलोली तालुका दंडाधिकाऱ्यांच्या समक्ष प्रस्ताव ठेवण्यासाठी नऊ सप्टेंबरला धोडिंबा नारायण कोकाटे (वय ४७, रा. काबरानगर, नांदेड, सध्या रा. बिलोली) (Nanded) याने पाच हजारांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (Anti Corruption Bureau) तशी तक्रार दिली. कोकाटे याने पाच हजार लाचेची मागणी करून दोन हजारांवर तडजोड केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

त्यानंतर विभागाच्या पथकाने येथे सापळा लावला. त्यावेळी दोन हजार स्वीकारताना कोकाटे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपअधीक्षक धरमसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील, निरीक्षक शेषराव नीतनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अशोक इप्पर, निरीक्षक अरविंद हिंगोले, पोलिस नायक किशन चिंतोरे, जग्गनाथ अनंतवार, ईश्वर जाधव, मुजीब शेख आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT