मराठा आरक्षण sakal
नांदेड

नांदेड : मराठा आरक्षणाचा भाजपच विरोधक

कॉँग्रेसच्या सचिन सावंतांचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यात गैरसमज पसरविण्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामीसाठी भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम सुरू केला आहे. मराठा आरक्षणाबाबतही भाजपने हाच अजेंडा पुढे रेटला आहे. मराठा आरक्षणाविरोधात भाजपशी संबंधित 'सेव्ह मेरिट’ ही संघटना असून, तिला रसद पुरविण्याचे कार्य देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाले. त्यामुळे मराठा आरक्षणास भाजपचा प्रखर विरोध असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

येथे रविवारी (ता.२४) पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यातील कोकण आणि गुजरातमध्ये अतिवृष्टी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला मदत दिली. ती कोकणाला दिली नाही. त्यामुळे केंद्र सरकार हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रति बेजबाबदार असल्याचे सिद्ध होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पीकविम्याबाबत बीड पॅटर्न राबविण्याची विनंती केली. ती अद्याप मान्य झाली नाही.

नाराजी नाही काँग्रेस प्रवक्ते पदाच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता सावंत म्हणाले, ‘मी अनेक वर्षांपासून या पदाची दबाबदारी पार पाडत आलो आहे. त्यामुळे मी पक्षाकडे त्यापेक्षा पुढची जबाबदारी मागितली आहे. त्यावर पक्ष विचार करील. त्यात माझी नाराजी अजिबात नाही’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT