BJP Women protests against sale of wine in grocery store nanded sakal
नांदेड

भाजप महिला आघाडीतर्फे वाईन विक्री निर्णयाचा निषेध

किराणा दुकानात वाईन विक्री सुरू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, म्हणून नांदेड महानगर भाजपा महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री सुरू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, म्हणून नांदेड महानगर भाजपा महिला आघाडीच्या वतीने सोमवारी (ता.१४) आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व सरचिटणीस अॅड. दिलीप ठाकुर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नगरसेविका वैशाली देशमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शीतल भालके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. किराणा दुकानात महिला व लहान मुलांचा सतत वावर असल्याने हा निर्णय चुकीचा असल्याचे भाजपासह अनेक नागरिक सांगत आहेत. या निर्णयामुळे भावी तरुण पिढी बर्बाद होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दारु विक्री निर्णयाचे स्वागत केले म्हणून त्यांना एक हजार महिलांच्या भावना पत्राद्वारे पोस्ट करण्यात आली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात महिला आघाडीच्या शततारका पांढरे, सुषमा ठाकुर, अपर्णा चितळे, अश्विनी जाधव, कांचन गहलोत, मंडळ अध्यक्ष संदीप कऱ्हाळे, भाजपा प्रवक्ता धीरज स्वामी, चिटणीस कुणाल गजभारे, सोशल मीडियाचे बाळु लोंढे, अक्षय अमिलकंठवार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT