फोटो 
नांदेड

मठाधिपतीच्या खुनाची सीबीआय चौकशी करा- शिवा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : उमरी तालुक्यातील नागठाणा (बु.) या गावात विरशैव- लिंगायत समाजाचा मठ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या मठाचे मठाधिपती म्हणून निर्वाणरुद्र पशुपतीनाथ शिवाचार्य महाराज मागील १२ वर्षांपासून कार्यरत होते. या मठाला हजारो शिष्य व भक्तांची मांदियाळी आहे.

ता. २४ मे रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान मठातच निवार्णरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा व अन्य एका सेवेकऱ्याचा नागठाण बु. या गावातीलच आरोपी साईनाथ लिंगाडे या तरुणाने गळा दाबून निघृण खूण केला. या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवा संघटनेनी राज्याचे मुुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

शिवा संघटनेची मागणी

शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांना समजल्यानंतर त्यांनी त्वरित जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस उपाधीक्षक यांना फोन करुन जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होवू देणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तेव्हा हजारो भक्तांच्या व शिष्यांच्या उपस्थितीत विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सदर प्रकरणाची चौकशी ही संशयास्पद वाटते.

पोलिस तपासाबद्दल संशय

या प्रकरणातील पोलिस उपाधीक्षक सुनिल पाटील व पोलिस निरीक्षक अशोक अंतरे तपासाची दिशा बदण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे व तपास योग्य रितीने होत नसल्यामुळे शिवा संघटनेने सीबीआय चौकशीची मागणी नुकतीच केली आहे.

सीबीआय मार्फत चौकशी न केल्यास उच्च न्यायालयात जाणार

सदर प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. सीबीआय चौकशीची मागणी शिवा संघटनेचे प्रा. मनोहर धोंडे, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबिडे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हा संपर्क प्रमुख इंजि. अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष (द.) संभाजी पा. बुड्डे, जिल्हाध्यक्ष (उ.) शंकर पत्रे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष (द.) दिगंबर मांजरमकर, जिल्हाध्यक्ष (उ.) विरभद्र बसापुरे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके, विद्यार्थी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष राहुल शिवशेट्टे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष (द.) नंदा पाटील, आघाडी जिल्हाध्यक्ष (उ.) सत्यभामाताई येजगे, नांदेड शहर प्रमुख शिवराज उमाटे, विजय हिंगमिरे यांनी केले आहे.

उत्तराधिकारी महाराष्ट्रातील बसविण्यात यावा

मठाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून कर्नाटकी उत्तराधिकारी बसविण्यात यावा यासाठी काही जणांचे मनसुबे असून सदर मठावर उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्रातीलच गुरुवर्य बसवावा यासाठी शिवा संघटनेचा पुढाकार असणार आहे.
- प्रा. मनोहर धोंडे 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT