File photo 
नांदेड

नांदेड ः बच्चेकंपनींनी यंदा सहल आणि गॅदरिंगला केले ‘मिस’ 

प्रमोद चौधरी

नांदेड : दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात शाळा-महाविद्यालयांमधून शैक्षणिक सहलीसह वार्षिक स्नेहसंमेलनाची धामधूम असते. परंतू यंदा कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने निर्बंध आले आहेत. सध्या ग्रामीण भागातील शाळा बच्चेकंपनीसाठी ‘लॉक’च असल्याने चिमुकल्यांना यंदा सहलीची मज्जा आणि गॅदरिंगचा आनंद लुटता आलेला नाही. बच्चेकंपनी मात्र दरवर्षी शाळेत होणाऱ्या सहलीतील ‘मज्जा’ आणि गॅदरिंगमधील ‘धम्माल’ मिस केल्याची खंत चिमुकल्यांसह शिक्षकांमधूनही व्यक्त होत आहे. 

दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर डिसेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहल आणि वार्षिक स्नेहसंमेलांची चाहूल लागते. सहलीमुळे चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अनोळखी गावाचा प्रवास करताना विद्यार्थी वेगळ्याच विश्वात रममाण होतात. यातून विविध ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. सहलीसोबतच वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची मोठी संधी असते. 

सगळ्याच गोष्टींना केले मिस
परंतु यंदा मार्च महिन्यापासून शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले असल्याने सहल आणि वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या सात महिन्यांपासून घरीच बसून कंटाळलेली बच्चेकंपनी शाळेचे विश्व प्रत्यक्ष अनुभवता आली नसल्याने हिरमुसली आहेत. सहल, गॅदरिंग, प्रार्थना, शालेय परिपाठ या सगळ्या गोष्टींना ‘मिस’ करत असल्याचे दिसून येत आहे. 

येथे क्लिक कराच - नांदेड : बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज व्हावे : खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे
  
दिवाळीत थोडीफार उसंत 
यंदा कोरोनाच्या धास्तीतच शैक्षणिक अर्धे सत्र संपून गेले आहे. घरी बसून कंटाळा आलेली मुले कोरोनामुळे कुठे पाहुणे म्हणून गेलेली नाहीत. आजोळ, मामाचे गाव अशी उन्हाळा सुट्टीत मजा करण्यासाठी ठरलेली गावे कोरोनामुळे बच्चेकंपनीला या गावांना जाता आलेले नाही. दिवाळी आणि भाऊबीजेला आई वडिलांसोबत थोडेफार बाहेर जायला मिळाले. तीच थोडीफार उसंत. परंतू गेल्या आठ महिन्यांपासून गंमतजंमत नावाचा प्रकारच त्यांना अनुभवता येत नसल्याने बच्चेकंपनी हिरमुसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT