file photo 
नांदेड

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा- प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येत्या पाच वर्षात राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना तांत्रिक ज्ञानाने कुशल तंत्रज्ञांची चणचण भासणार हे निश्चित. त्यामुळे भविष्याची चाहूल ओळखत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच पॉलिटेक्निकचे विविध पर्याय जसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, डी.एम.एल.टी इत्यादी निवडून उज्वल भविष्याची सुरुवात करावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे.

टाळेबंदीच्या काळात सुद्धा एच.सी.एल टेक्नॉलॉजी, आय.एस.टी.सी, बजाज प्रा.ली., एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी, टाटा इंजिनीरिंग, जॉन डिअर, लोकेश मशीन, व्हेरॉक इंजिनीअरिंग, अदाणी इलेक्ट्रिकल्स, फोर्ब्स मार्शल, महिंद्रा अँड महिंद्रा, सुरोज बिल्डकॉम, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, व्हर्लपूल, अश्या अनेक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची मागणी होते आहे. ह्या कंपन्या विद्यार्थ्यांना ऑन-रोल देखील घेण्यास तयार आहेत. 

विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी देखील ऑनलाईन नोंदणी करायला हरकत नाही

पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो तोही कुठल्याही प्रवेश परिक्षेशिवाय. दहावी नंतर आय.टी.आय. मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रात कनिष्ठ पातळीवर कामासाठी निवडला जाईल. तर पॉलिटेक्निक पदविका प्राप्त विद्यार्थी सुपरवायझरी लेव्हलवर निवडले जातात. त्यामुळे आय.टी.आय. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी देखील ऑनलाईन नोंदणी करायला हरकत नाही असेही ते म्हणाले.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा  विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी फायदा

यातच मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी अनेक शासकीय योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश मिळतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा  विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी फायदा घेता येतो. खुल्या प्रवर्गासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत निवास व भोजनासाठी शिष्यवृत्ती मिळते. तसेच वार्षिक 6 लक्ष उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना इ बी सी सवलतीचा फायदा मिळतो. व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी, निवास व भोजनासाठी दरवर्षी आर्थिक मदत शासनातर्फे मिळते.  अल्पसंख्यांक अर्थात मुस्लिम, जैन, बौद्ध, पारशी, शीख आदी विद्यार्थ्यांना अधिकतम 25 हजार रुपये पर्यंतचे शिक्षण शुल्क माफ केले जाते. या शिवाय आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या होतकरु, हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे ट्युशन फीस वेवर स्कीम अंतर्गत प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांची सर्व शिक्षण शुल्क शासनातर्फे दिले जाते. ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाचे अट असते.

तांत्रिक शिक्षणाचा राजमार्ग निवडणे ही नक्कीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

या सर्व आर्थिक सोई-सुविधांचा लाभ घेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन करणे किंवा घरुनच आपल्या मोबाईलवरुन करणे बंधनकारक आहे. कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तांत्रिक शिक्षणाचा वाटा मोठा आहे त्यामुळे इतर पारंपारिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निकच्या तांत्रिक शिक्षणाचा राजमार्ग निवडणे ही नक्कीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल. त्यामुळे तंत्रशिक्षण पदविकेची निवड करत उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिले पाऊल टाकावे असे आवाहन प्राचार्य, डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT