लसीकरण 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात कोव्हॅक्सीनपेक्षा कोवीशिल्ड लसीकडे नागरिकांचा कल

45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या- त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात 18 मेपर्यंत एकुण चार लाख चार हजार 665 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात (Covid-19 vaccination) आले. जिल्ह्यात 19 मेपर्यंत कोविशिल्डचे तीन लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे एक लाख पाच हजार 340 डोस असे चार लाख 40 हजार 270 डोस मिळाले आहेत. एकंदरीत नांदेडकरांचा (Nanded ciyizons) कल हा कोव्हॅक्सीनपेक्षा कोवीशिल्ड लसीकडे असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतु जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग व महापालिका प्रशासन लसीकरण प्रक्रियेत कमी पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. याचा फटाक सर्वसामान्य व जेष्ठ नागरिकांना बसत आहे.

45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या- त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. 20) मे रोजी केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींचा समावेश आहे.

हेही वाचा - नांदेड विभागाचा पट्टा पडला; ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या आठ केंद्रावर कोविशिल्डचे 100 डोस प्रत्येकी देण्यात आले. श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको, दशमेश हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल या 11 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले.

येथे क्लिक करा - राजीव सातव आपल्यामध्ये नाहीत हे मन मानायला तयार नाही. मागील पंधरा वर्षापसून आम्ही सतत सोबत होतो. या काळात सातव यांनी पक्षवाढीसाठी निस्वार्थ भावनेने केलेले काम आपण जवळून पाहिले आहे.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय लोहा, मुदखेड, बारड येथे कोविशिल्डचे 80 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोव्हॅक्सिनचे 50 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कॉव्हॅक्सिनचे 70 डोस तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

जिल्ह्यात 18 मे पर्यंत एकुण चार लाख चार हजार 665 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयात 19 मे पर्यंत कोविशिल्डचे तीन लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सीनचे एक लाख 5 हजार 340 डोस असे एकुण चार लाख 40 हजार 270 डोस मिळाले आहेत.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan : आज रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार; किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या...

शाळा-महाविद्यालयांना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या महिलेला गुजरातमधून अटक; प्रेम नाकारल्यामुळे घेतला सूड, मोदी स्टेडियम उडवण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ने रोखली 'वारणा'ची ऊस वाहतूक; दोन दिवसांत दर न जाहीर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune ATS : दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत जुबेरकडून सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

विदर्भाच्‍या पोरी खेळातही भारी! क्रिकेटसाठी सोडले गाव अन् घर; पुसदच्या कस्तुरी जगतापचा संघर्ष

SCROLL FOR NEXT