download.jpg 
नांदेड

यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

अभय कुळकजाईकर


नांदेड : यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेला पाऊस, अतिवृष्टी आणि धरणांमध्ये झालेला पाणीसाठा आदी कारणांमुळे गेल्या चार पाच दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे. यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता असून आत्तापासून अडगळीत ठेवण्यात आलेले उबदार कपडे बाहेर निघण्यास सुरूवात झाली आहे.
 
यंदाच्या वर्षी मराठवाड्यात जवळपास सर्वत्र पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. दमदार पावसामुळे यंदा नदी, नाले, ओढेही ओसंडून वाहत आहेत. त्याचबरोबर अनेक धरण, प्रकल्पात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रब्बी हंगामही चांगला होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरीपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेल्यामुळे मोठे नुकसान झाले त्यामुळे आता हे नुकसान रब्बीच्या हंगामातून निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

थंडीची चाहूल लवकरच
दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान थंडीची चाहूल लागले पण यंदाच्या वर्षी थंडीची चाहूल थोडी आधीपासूनच लागली आहे. विशेष करून मध्यरात्रीनंतर किमान तापमानात कमालीची घट दिसून येते आहे. तसेच पहाटे वेळी कडाक्याच्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे आता अनेकांच्या अंगावर उबदार कपडे दिसू लागले आहेत. नांदेड शहर आणि परिसराचे किमान तापमानही गेल्या चार पाच दिवसापासून कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना संसर्गाचीही भीती
नांदेडला गेल्या दोन चार दिवसापासून किमान तापमान कमी होताना दिसून येत आहे. दरम्यान, यंदा कोरोनाचे संकट असून अजूनही कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले नाही. त्यात थंडीचा कडाका वाढला तर सर्दी, पडसे सारखे आजार येऊ शकतात. तसेच कोरोनाची दुसरी लाटही येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याचीही विशेष काळजी यंदा सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. 

किमान तापमानात घट होणार ः औंधकर
प्रशांत महासागराच्या विषुववृत्ताच्या भागात ‘ला निना’ची वाटचाल ‘सुपर ला निना’कडे सुरू आहे. परिणामतः नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात आपल्याकडे किमान तापमानात कमालीची घट दिसून येणार आहे. दिवाळीच्या काळात यात आणखी चार ते पाच अंशांची घट अपेक्षित आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. ता. १२ आणि ता. १३ नोव्हेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु मराठवाड्यात याचा फारसा परिणाम होणार नाही, असे दिसून येत आहे. 
- श्रीनिवास औंधकर, संचालक, 
एमजीएम डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT