नांदेड जिल्हाधिकारी डाॅ. विपीन  
नांदेड

डाॅ. विपीन यांची धाडशी कारवाई; सात हायवा, १८ रोपवे, दोन जेसीबी व हजारो ब्रास वाळू जप्त

नांदेड तालुक्यातील गंगाबेट आणि मार्कंड वाळू घाटावर गुरुवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी बोटीद्वारे आपल्या पथकासह कारवाई केली.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : संबंध देशभर कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासन डोळ्यात तेल ओतून काम करत आहे. मागील दीड वर्षापासून आपल्या परिवारासाठी वेळ न देत आपले कर्तव्य म्हणून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर हे आपल्या सहकाऱ्यांसह नेटाने पार पाडत आहेत. जिल्हाप्रशासन लाॅकडाऊनच्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून वाळू माफिया सक्रीय असून हजारो ब्रास वाळूची तस्करी करत आहेत. परंतू मांजर डोळे मिटून दूध पिते तर तिला वाटते की आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही. असे होत नाही.

तसाच प्रकार जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांच्याबाबतीत वाळू माफियांना वाटला आणि एका दणक्यातच वाळू माफिया सैराट झाले. नांदेड तालुक्यातील गंगाबेट आणि मार्कंड वाळू घाटावर गुरुवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी बोटीद्वारे आपल्या पथकासह कारवाई केली. यावेळी सात हायवा, १८ रोपवे, दोन जेसीबी आणि टोकरे व हजारो ब्रास वाळू जप्त केली. यावेळी वाळू माफिया मात्र पसार झाले. जिल्हाधिकारी यांनी या भागाचे नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचीही चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा - कोविडने अनाथ झालेल्या बालकांच्या काळजीसाठी पालक म्हणून पुढे या- डॉ. विपीन इटनकर

वाळू घाटाचा खडतर प्रवास करुण कारवाई

जिल्ह्यात व तालुक्यात बेसुमार अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे जगजाहिर असतांना महसूल आणि पोलिस प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे. यावरुन गुरुवारी (ता. २७) अखेर नांदेडच्या जिल्हाधिका-यांना वाळू घाटाचा खडतर प्रवास करुन कारवाई करावी लागली. चारचाकी वाहन जाईल तिथपर्यंत, त्यानंतर दुचाकी आणि पुन्हा पायी प्रवास करत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी वाळू घाट गाठले.

महसूल विभागातील झारीतील शुक्राचाऱ्यांवरही होणार कारवाई

नांदेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील अनेक गावातून बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. मार्कंड, पिंपळगांव, भनगी, गंगाबेटसह आदी गाव शिवारातुन नदी घाटावरुन दररोज हजारो ब्रास अवैध वाळू उपसा सुरु आहे. गेल्या दीड़ ते दोन महिन्यापासुन उघडपणे हा प्रकार सुरु होता. बड्या राजकीय वरदहस्त आणि महसूल विभागातील झारीतील शुक्राचा-र्यांमुळे कुणीही कारवाई करत नव्हते. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी विपिन इटनकर कुठलीही माहिती न देता आपल्या वाहनाने निघाले.

येथे क्लिक करा - हूनगुंदा रेती घाटातून बेसुमार उत्खनन; महसूल प्रशासनाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष, आता जिल्हाधिकारी घालणार लक्ष

या धडक कारवाईमुळे सैराट झालेले वाळू माफिया भानावर

गोदावरी नदीतुन एका बोटीद्वारे पथक रवाना करण्यात आले. घाटावर खडतर रस्ता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकी आणि पायीही प्रवास केला. झाडाझुड़पात लपवून ठेवलेल्या जेसीबी ही जिल्हाधिकाऱ्यांनी शोधून काढल्या. मार्कंड येथे बोटीतून वाळू उपसा सुरु असल्याचे निदर्शनास आले. या ठिकानणाहुन दोन जेसीबी जप्त करण्यात आल्या. गंगाबेट येथे नदीत टाकलेले तब्बल 18 रोप वे आणि मशीन्स जप्त करण्यात आल्या तर सात हायवा गाड्याही जप्त करण्यात आल्या. जिल्हाधिका-यांच्या या धडक कारवाईमुळे सैराट झालेले वाळू माफिया भानावर येणार आहेत. तर अनेकांचे धाबे दणाणले आहे. जप्त केलेले सर्व साहित्य नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT