नांदेड - महापौर मोहिनी येवनकर यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली.  
नांदेड

नांदेड शहरातील रखडलेली विकासकामे गतीने पूर्ण करा - महापौर मोहिनी येवनकर

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहरातील रखडलेली विकासकामे दर्जेदार व गतीने पूर्ण करा, असे निर्देश महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी शहर विकास कामाच्या आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर डेंगीचे रुग्ण आढळल्याचे वृत्त आल्यामुळे आरोग्य विभागाने घरोघरी सर्व्हे, जनजागृती व फॉगींग मशिनची फवारणी यासह आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.  

महापौर मोहिनी येवनकर यांच्या दालनात शहरातील विविध विकास कामाचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपमहापौर मसूद खान, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती किशोर स्वामी, आनंद चव्हाण, शमीम अब्दुल्ला, विजय येवनकर आदींची उपस्थिती होती.

विकासकामांचा घेतला आढावा
या प्रसंगी नांदेड शहरातील विविध भागातील रस्ता दुरुस्ती, मलनिसारण, शिवाजीनगरच्या जनता मार्केट शॉपिंग कॉम्प्लेक्स, महापालिकेची कर वसुली यासह शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर मोहिनी येवनकर यांनी यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असताना शहरवासियांना रोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. महापालिकेच्या कर वसुलीचे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करावे. तसेच शहरातील रखडलेली विकासकामे दर्जेदार व गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश महापौर येवनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

डेंगीसाठी उपाययोजना करा
शहराच्या काही भागात डेंगीचे रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. यासाठी घरोघरी सर्व्हे, जनजागृती व फॉगींग मशिनची फवारणी यासह आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापालिकेच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी दिले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या बाबतची माहिती त्यांनी घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, हिवताप विभागाचे गणेश भुसा आदींची उपस्थिती होती.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बिसेन म्हणाले की, शहराच्या काही भागात डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. डेंगीचा फैलाव होऊ नये, यासाठी महापालिका आरोग्य विभागातर्फे शहरवासियात जनजागृती, सर्व्हे करण्यात येत असल्याचे सांगितले. या प्रसंगी महापौर येवनकर यांनी शहराच्या काही भागात डेंगीचे रुग्ण आढळले असले तरी डेंगीचा फैलाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयात सुविधा द्यावी
शहरातील सर्वसामान्य रुग्णांना खासगी अथवा विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात जाण्याऐवजी आपल्या महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शहरातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महापौर येवनकर यांनी दिले आहेत. शहरातील श्यामनगरसह विविध रुग्णालयांना लवकरच महापौर येवनकर भेटी देणार असून एक्सरे, सोनोग्राफी मशीन यासह आरोग्य सुविधेचाही आढावा घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT