fail photo  
नांदेड

मुक्त विद्यापीठ, डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यामध्ये संभ्रम - कसा तो वाचा

सकाळवृत्तसेवा

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांच्या आरोग्य हितासाठी बहुतांशी अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करुन त्यांना पुढील वर्षात प्रमोट केले. पण विविध मुक्त विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमासह डिप्लोमा अभ्यासक्रमाबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

त्यामुळे माध्यमिक व महाविद्यालयीन निर्णयाच्या धर्तीवर विविध मुक्त विद्यापीठासह डिप्लोमा अभ्यासक्रमाचाही सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यहितासह शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी विद्यार्थी कार्यकर्ते तुषार देशमुख यांनी केली आहे. 

कोरोना या जागतिक महामारीच्या संसर्गाचे गांभीर्य राखून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. दरम्यान, महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करुन तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना श्रेणी गुणांकन देणाऱ्या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
 
हे ही वाचा
नांदेडकरांनो बाहेर पडताय, तर मग ही घ्या त्रिसूत्री... ​

महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन कालावधीत परीक्षा धोक्याच्या ठरणार असल्याचा समितीच्या अहवालानुसार अनुदान आयोगाकडे (ugc) राज्य सरकार व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा करून बहूतांश अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय जारी केला. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशप्रक्रिया तयारीला लागले आहेत. त्याचबरोबर तृतीय व शेवटच्या वर्षात अभ्यासक्रमासाठी श्रेणी गुणांकनाचा निर्णय जवळपास घेण्यात आल्याने महाविद्यालयीन पदवी अभ्यासक्रमाचा प्रश्न निकाली निघाला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, लोकमान्य टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठां०तर्गत विविध पदवी अभ्यासक्रमासह, पॉली, डी. फॉर्मसी, शिक्षकपात्र प्रवेश बी.एड. डिप्लोमा अभ्यासक्रमाबाबत अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

 विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अभ्यासक्रमांतर्गत प्रचलित नियमांनुसार विद्यापीठ, महाविद्यालयांकडून प्रॅक्टीकल, सेक्शनल परीक्षेसाठी ॲपद्वारे ऑनलाइनचा मार्ग अवलंबिण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

कोरोना महामारीच्या संक्रमणाचे गांभीर्य लक्षत घेता विविध मुक्त विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमासह डिप्लोमाचे विद्यार्थी शासनाच्या ठोस निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या धर्तीवर निर्णय घेवून मुक्त विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमातील पहिल्या व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षात तर डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रमोट करण्यात यावे. त्याचबरोबर डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या द्वितीय व अंतिम वर्ष अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना श्रेणी गुणांकनाची मागणी विद्यार्थी कार्यकर्ते तुषार देशमुख यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT