नांदेड : कुत्रा चावल्याचा आव आणून ग्रामिण रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधिकाऱ्यास शिविगाळ करून गोंधळ घालणाऱ्याविरुद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला. एवढेच नाही तर पीएसआयला व कलेक्टरला फोन लाव माझे कोणीच काही करु शकत नाही असा दमही दिला.
हिमायतनगर येथील ग्रामिण रुग्णालयात सोमवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास दुर्गेश शाम मंडोजवार (वय २१) हा आला. मला कुत्रा चावला आहे असे खोटे सांगुन माझ्यावर उपचार करा असे म्हणाला. मात्र त्याला कुत्रा चावला नव्हता. एवढेच नाही तर वैद्यकीय अधिकाऱ्याला कुठे फिरत आहात असे म्हणून शिविगाळ केली. रुग्णालयातील इतर रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना शिविगाळ करत गोंधळ घातला. मला तु ओळखत नाहीस का असे म्हणून पीएसआयला किंवा कलेक्टरला फोन लाव, माझे कोणीच काही करुन शकत नाही असे म्हणून शासकिय कामात अडथळा निर्णाण केला.
आठवड्यातील डॉक्टरला मारहाणीची दुसरी घटना
रुग्णालयात दहशत पसरविली व टेबलवरील फायलींची फेकाफेक केली. डॉ. लक्ष्मण देवराव नाईक यांच्या फिर्यादीवरुन दुर्गेश मंडोजवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. देवकत्ते करत आहेत. या आठवड्यातील डॉक्टरला मारहाणीची ही दुसरी घटना असल्याने वैद्यकीय क्षेत्रात भितीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - ‘ध’ चा ‘मा’ झाल्यामुळे नांदेडकर बुचकळ्यात, जबाबदारी कोणाची?
इतवारात चाकुने मारून गंभीर जखमी
नांदेड : दारु नशेत मित्राच्या अंगावर पाण्याची बॉटल फेकून मारल्याने संतप्त झालेल्या मित्राने त्याच्यावर चाकुने हल्ला केला. यात महमद हुसेन याच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. ही घटना इतवारा परिसरातील खमरोद्दीन मशिदीसमोर मंगळवारी (ता. १९) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, महमद हुसेन अब्दुल रफीक (वय ३५) रा. मिट्टी का शेर हा आपल्या एका मित्रासोबत बाहेर फिरायला आला होता. या दोघांनी रस्त्यात दारु पीले. त्यानंतर खमरोद्दीन मशीदीसमोर येताच महमद हुसेन याच्या अंगावर पाण्याची बाटल फेकून मारली. यावेळी पाणी बाटली का मारली असे विचारताच महमद हुसेन याच्या हातावर चाकुने मारून गंभीर जखमी केले. शिविगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. महमद हुसेन याच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दत्तात्र्य काळे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.