नांदेड काॅंग्रेस आंदोलन 
नांदेड

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेसच्यावतीने येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत आज आंदोलन केले.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस शुक्रवारी (ता. १८) जून रोजी संपूर्ण देशभर संकल्प दिन म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. या संकल्पदिनी जनसामान्यांविरुध्द केंद्र शासनाने राबविलेल्या धोरणांच्या निषेधार्थ नांदेड शहर व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसच्यावतीने येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत आज आंदोलन केले. शेतकर्‍यांविरुध्द पाशवी बहुमताच्या आधारावर संसदेमध्ये मंजूर केलेले काळे कायदे, पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस यांच्या वाढलेल्या किंमती, खाद्यतेल, डाळी व इतर जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीने आकाशाला घातलेली गवसणी. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. या नागरिकांच्या भावना निर्ढावलेल्या केंद्र शासनापर्यंत पोचविण्यासाठी संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्येही केंद्र शासनाविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले मात्र नवरदेवाने दुसरीकडेच लग्न केले

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले. या आंदोलनासाठी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

या आंदोलनात महिला काँग्रेसचा मोठा सहभाग होता. आजच्या आंदोलनामध्ये नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, सभापती संगीता पाटील, डॉ. रेखा चव्हाण, मंगला निमकर, अनिता इंगोले, सुमती व्याहाळकर, कविता कळसकर, अनुजा तेहरा, मंगला धुळेकर, जयश्री राठोड, हाफिज, सतीष देशमुख तरोडेकर, शमीम अब्दुल्ला, अब्दुल लतीफ, नागनाथ गड्डम, अब्दुल गफार, रहिमखान, किशान कल्याणकर, सुरेश हटकर, रमेश गोडबोले, भालचंद्र पवळे, संतोष मुळे, सुमित मुथा, धिरज यादव, जगदीश शहाणे, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, दिशेन मोरताळे, अजीज कुरेशी, नासेर, साहेबराव सावंत, सलाम चावलवाला, चाँदपाशा कुरेशी, मुन्तजीब, रहिम पठाण, संघरत्न कांबळे, अविनाश कदम, संजय वाघमारे, हंसराज काटकांबळे, ललीता कुंभार, पद्मा झंपलवाड, सुषमा थोरात, जेसीका शिंदे, अरुणा पुरी आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT