Congress expelled ten corporators from the party Esakal
नांदेड

Congress: विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये भूकंप! दहा नगरसेवकांची पक्षातून का केली हकालपट्टी? भाजपचा आहे थेट संबंध

Maharashtra Congress: काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या गावात काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर आहे. त्यामुळे आम्ही पक्षाचे काम केले नाही असा आरोप करणे चुकीचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह १० नगरसेवकांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी सोमवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, तालुका प्रभारी डॉ. उत्तम इंगळे, बळिराम पाटील, शेख मकसूद, रवींद्र डाढळे, सुभाष लोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद सोळंके आदी उपस्थित होते.

पक्षाने केलेल्या कारवाईची माहिती देताना कदम म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई करण्याचे अधिकार दिल्याने नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष यास्मीन सुलतान अब्दुल मुसबीर खतीब, शालिनी राजू शेटे, डॉ. पल्लवी विशाल लंगडे, सोनाजी सरोदे, वैशाली प्रवीण देशमुख, मीनाक्षी व्यंकटी राऊत, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, साहेरा बेगम काझी सल्लाउद्दीन या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली.

कारवाई अन्यायकारक

शालिनी शेटे लोकसभा निवडणुकीत पक्षाने आमच्यावर अविश्वास दाखवून कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली नव्हती. पक्षातून हकालपट्टी करण्यापूर्वी आमची बाजू मांडण्यासाठी संधी दिली नाही. त्यामुळे पक्षाने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ही एकतर्फी कारवाई केली असून, आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागणार आहे, असे गटनेत्या शालिनी शेटे यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्षांना अधिकार नाही

पक्षाने आमच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या गावात काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर आहे. त्यामुळे आम्ही पक्षाचे काम केले नाही असा आरोप करणे चुकीचे आहे, अशी माहिती नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT