मी चालत राहिलो तरी वादळ निर्माण होते! : सदाभाऊ खोत  
नांदेड

कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकार चळवळीला हरताळ; खोतांचा आरोप

अभय कुळकजाईकर

नांदेड : सहकार चळवळीच्या उद्देशाला कॉँग्रेस Congress Party, राष्ट्रवादी कॉंग्रेसने Nationalist Congress Party हरताळ फासला. या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी साखर कारखाने आपसात वाटून घेत या चळवळीचे श्राद्ध घातल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी केला. रयत क्रांती संघटनेच्या Rayat Kranti Sanghatana माध्यमातून राज्यभर शेतकऱ्यांशी संवाद सुरू आहे. जिल्ह्यात Nanded आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खोत यांनी बुधवारी (ता. १४) भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांना मालक बनविण्याची चांगली कल्पना होती. त्यातून साखर तसेच इतर कारखाने उभे राहिले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हे कारखाने आपसात वाटून घेतले आहेत. राज्यात ५५ सहकारी साखर कारखान्यांत २५ हजार कोटींचा घोळ आहे. त्यात जिल्हा सहकारी बँकांचेही हात गुंतले आहेत.congress, ncp destroyed cooperative movment, sadabhau khot allegation in nanded glp88

सहकारी साखर कारखान्यांत सरकारचे बाराशे कोटी तर शेतकऱ्यांचे अडीच हजार कोटींच्या घरात भागभांडवल आहे. आता हे कारखाने दहा ते वीस कोटी रुपयांमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांची वाट लावली आहे. असे सर्व साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे व्हावेत, यासाठी भविष्यात रयत क्रांती संघटना आंदोलन करील, असा इशाराही खोत यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा... मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

Pune Viral : पुण्यात गणपती विसर्जनाला पैशांचा पाऊस; पाचशे, शंभरच्या नोटांचा खच, पैसे उचलायला भाविकांची झुंबड उडाली अन् पुढे जे झालं...

Latest Marathi News Updates : 'कोल्हापूर गॅझेटियर' संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद

Who is IAS Sakshi Sawhney? युवराज सिंगने कौतुक केलं, त्या साक्षी साहनी आहेत तरी कोण? व्यक्त केली भेटण्याची इच्छा

Pune Crime : पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT