file photo 
नांदेड

नांदेड विभाग मुंबई मध्य रेल्वे विभागाला जोडा- खा. प्रतापराव पाटील चिखलीकर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदेड विभागाला काढून मुंबई मध्य रेल्वे विभागाला जोडण्यात यावा अशी मागणी नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

नांदेड रेल्वे विभागाची स्थापना झाल्यापासून हा विभाग तेलंगणातील सिकंदराबाद दक्षिण मध्य रेल्वे विभागाला जोडला गेला आहे. वास्तविक भाषिक समस्या आणि सिकंदराबाद मध्य रेल्वे विभागाची मराठवाड्यास मिळणारी सापत्न वागणूक यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या असंख्य समस्या सुटल्या नाहीत. परिणामी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे मागील वीस वर्षांपासून मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी नांदेड रेल्वे विभागाला दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काढून मुंबई रेल्वे मध्य विभागाला जोडण्यात यावा अशी मागणी करीत आहेत. यानुषांगणे महाराष्ट्राच्या विधानसभेतही तसा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. मराठवाड्याला दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे आणि त्या विभागाच्या दुर्लक्षामुळे नांदेड रेल्वे विभागाचा विकास होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेवून नांदेड रेल्वे विभाग दक्षिण मध्य रेल्वे विभागातून काढून तो मुंबई रेल्वे विभागाला जोडण्यात यावा अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

दरम्यान गत वर्षी नांदेड- बीदर या नव्या रेलवे मार्गाला आपण मजुरी दिलात त्यामुळे या भागातील जनतेनी आपले व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. परंतु या नव्या मार्गाच्या निर्माणासाठी कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने जतेत पुन्हा नैराश्य निर्माण होण्याची भीती आहे. आपण अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेत नांदेड बीदर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी तातडीने संबंधितांना सुचाण्या देण्यात याव्यात. जनतेची मागणी लक्षात घेता नांदेड बीदर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु होणे अपेक्षित आहे. त्यामुळं आपण स्वतः लक्ष देवून नांदेड बिदर नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी अशी मागणीही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक फायदा व्हावा, प्रवाशांना रेल्वे प्रवास सुखाचा व्हावा यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला असल्यामुळे अनेक रेल्वे सुरु झाल्या आहेत. भविष्यातही नांदेड आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील अशी माहितीही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT