Construction department materials cement and steel price decline
Construction department materials cement and steel price decline sakal
नांदेड

बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मागील वर्षभरापासून गजाळीच्या दरात सतत वाढ होत होती. गजाळीचे दर गगनाला भिडल्याने अनेक व्यवसायिकांसह सामान्य ग्राहकांनी तात्पुरत्या स्वरुपात बांधकाम थांबवलेली होती. मात्र, बुधवारी गजाळीचे दर ८५ रुपयांवरुन ६० ते ६१ रुपयापर्यंत कमी झाले. त्याचबरोबर सिमेंटचे दरही किंचीत कमी झाल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

घर बांधण्यासाठी वाळू, वीट, गिट्टी सोबतच गजाळी आणि सिमेंट हे महत्वाचे घटक असतात. गजाळी, सिमेंटचे दर आवाक्यात असतानाच मोठ्या व्यावसायिकांकडून सिमेंट आणि गजाळीची ठोक खरेदी करुन साठवणूक केली जाते व गरजेनुसार वापर केला जातो.

मात्र, युक्रेनमध्ये सुरु झालेल्या युद्धाचा थेट बांधकाम व्यावसायावर परिणाम झाल्याने मागील काही महिन्यापासून सिमेंट व गजाळीचे दरात सतत वाढत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी ठोक खरेदी न करता तीन दिवसासाठी लागणारी गजाळी सिमेंट दोन दिवस पुरेल, अशा हिशोबाने मागविण्यावर अधिक भर दिला होता. तर अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी तर गजाळीचे वाढलेले दर आणि ग्राहकांनी यापूर्वीच विक्री केलेल्या किंमतीत फ्लॅट देणे परवडत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात कामे बंद ठेवणे पसंत केले होते.

मात्र बुधवारपासून गजाळीचे दर ८५ रुपयावरुन थेट ६० ते ६१ रुपयांपर्यंत कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायीक व सामान्य ग्राहकांनी देखील थांबवलेले घराचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी सिमेंटचे दर कमी झाले नाहीत. यंदा सिमेंटचे दर किंचित कमी झाले आहे. मात्र, पुढील महिन्यापासून सिमेंटच्या दरात पुन्हा दहा ते वीस रुपयाने वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.

रशिया - युक्रेन युद्धाचा बांधकाम क्षेत्रावर थेट परिणाम दिसून आला. बांधकाम व्यवसायासाठी लागणारे लोखंड मिळेनासे झाले होते. खूप प्रयत्न करूनही वेळेवर साहित्य मिळत नसल्याचे काही वेळा बांधकाम बंद ठेवावे लागत होते. आताही परिस्थिती थोडी कमी तसेच लोखंडाचे दर कमी झाल्यामुळे थांबलेली बांधकामे पुन्हा सुरू करता येतील.

- रवी कडगे, उपाध्यक्ष, क्रेडाई संघटना.

बांधकाम साहित्याच्या किंमतीत झालेली ही वाढ नैसर्गिक आहे की, साठेबाजी आणि नफेखोरीमुळे होत आहे, याची सरकारी यंत्रणांनी पडताळणी करणे गरजेचे आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भाववाढ कमी झाल्याने सर्वसामान्यांना याचा नक्की फायदा होईल. तसेच मंदीसदृश्य अवस्थेत असलेल्या बांधकाम क्षेत्रास आता नांदेड सारख्या शहरांमध्येही उभारी येईल, अशी अपेक्षा आहे.

- विशाल वाघमारे भाटापूरकर, बांधकाम व्यावसायिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT