File Photo 
नांदेड

Corona Breaking ; नांदेडला पुन्हा सातचा झटका...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी (ता.चार) ६९ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सात संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १८२ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. विशेष म्हणजे नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमधील पाच रुग्ण हे लेबर कॉलनी येथील बाधित कामगार रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक असून यातील एक रुग्ण उमरखेड तर, एक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना स्वतःची व घरातील इतरांची काळजी घेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडु नका ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुलांना रुग्णालयाशिवाय घराबाहेर न जाण्याचे आवाहनदेखील केले आहे.

नांदेडकरांना ‘कोरोना’मुक्तची आशा लागली 
जिल्ह्यात केवळ २१ बाधीत रुग्णांवर उपचार सुरु असताना जिल्हा ‘कोरोना’मुक्त होतोय असे वाटत होते. परंतु, मागील दोन दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर होणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

- आज ६९ अहवाल प्राप्त
-  सात पॉझिटिव्ह
-  ४७ निगेटिव्ह
-  चार नाकारलेले नमुने
-  दोन अनिर्णित
- ७० प्रलंबित

आतापर्यंत:
- बाधित व्यक्तींची एकूण संख्या १८२
- १२६ जणांना घरी सोडले
- ४८ जणांवर उपचार सुरू
- आठ बाधितांचा मृत्यू

- संक्रमण वाढतेय..सर्वांनी काळजी घ्यावी.
नागरिकांना आवाहन: 

- स्वतःची व इतरांची काळजी घ्या.
- अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर निघू नका.
- मास्क वापरा आणि डोकेदेखील दुहेरी आवरणाच्या कापडाने झाकून ठेवा.
- सॅनिटायझरचा वापर करा.
- वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा.
- १० वर्षाखालील मुले, ६० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता आणि आजारग्रस्त व्यक्तींनी वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.
- दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राखावे.
- गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
- प्रवास शक्यतो टाळावा.
- प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अन्न, फळे व पेयाचे सेवन करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT