file photo 
नांदेड

कोरोना ब्रेकिंग - नांदेडला एकाचा मृत्यू, तर १३ जण पॉझिटिव्ह

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२६) कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गुलजारबाग भागातील एका ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २४ तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४४ झाली आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या अहवालात चार पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. त्यानंतर पुन्हा आलेल्या अहवालात आणखी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसभरातील संख्या १३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यूची संख्या १६ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

रुग्ण संख्या ३४४ वर

शहरातील उमर कॉलनी भागातील ५४ वर्षीय पुरुषाचा गुरुवारी (ता.२५) रात्री मृत्यू झाला होता. चोवीस तासाच्या आत जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. मयत झालेल्या रुग्णास उच्च रक्तदाब, श्‍वसनाचा त्रास आणि मधुमेह हे आजार होते. शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालातील चार रुग्णांमध्ये एक पुरुष ६२ वर्षीय तर तीन महिला (वय ५५, ५८, सहा) यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ३४४ वर पोचली आहे.

तीन रुग्ण झाले कोरोनामुक्त 
दरम्यान, शुक्रवारी विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एक तसेच पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन असे तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत २७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सहा जणांची प्रकृती गंभीर
उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी दोन महिला (वय ५० व ५५) आणि चार पुरुष (वय ३८, ४२, ६७ व ७५) यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

कोरोनाची संक्षिप्त माहिती
सर्व्हेक्षण - एक लाख ४६ हजार ४४४
घेतलेले स्वॅब - सहा हजार ४७
निगेटिव्ह स्वॅब - पाच हजार २४९
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ३४४
मृत्यू संख्या - १६
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ५८
रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या - २७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

SCROLL FOR NEXT