File Photo 
नांदेड

Corona Breaking ः आज पुन्हा सात पॉझिटिव्ह,  तीनच दिवसात ३७ रुग्णांची भर

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे मिटर दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (ता.पाच जून) प्राप्त झालेल्या ४८ स्वॅब नमुने अहवाल प्राप्त झाले.  त्यातील ३७ स्वॅब अहवाल निगेटिव्ह तर सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शुक्रवारी नव्याने आढळुन आलेल्या सात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुषांचा तर तीन महिलांचा समावेश असून, यातील सहा पॉझिटिव्ह रुग्ण हे नवीन आबादी येथील रहिवाशी आहेत. पूर्वी सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक माहूर तालुक्यातील पलाईगुडा येथील रहिवाशी आहे.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८९ इतकी झाली आहे. यातील आठ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार (ता.चार) सायंकाळपर्यंत १२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली.  
 
हेही वाचा- पैशाची अडचण ठरली दुय्यम, ‘श्री गुरुजी’त रुग्णावर सर्जरी प्रथम...

नवीन आबादीतील सहा रुग्णांची भर

गुरुवारी (ता.चार) सापडलेल्या सात पॉझिटिव्हपैकी पाच रुग्ण हे नवीन आबादी येथील बाधित कामगार रुग्णाशी संपर्कातील नातेवाईक असल्याची बाब मोर आली. तर दोन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे शहरातील नई आबादी येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या डझनभर झाली आहे. बुधवारी (ता. तीन) १११ स्वॅब अहवालापैकी ६३ स्वॅब नमुने अहवाल प्राप्त झाले होते. ४८ अहवालाची प्रतिक्षा होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा नवीन आबादी परीसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २५ संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. शुक्रवारी (ता.पाच) रोजी दुपारी ४८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात नवीन आबादीतील सहा रुग्णांची भर पडली आहे.
  
हेही वाचा- महाविद्यालयातील कॅम्पसचे लूक बदलणार, कशासाठी? ते वाचा ​

गर्दीच्या ठिकाणी समांतर अंतर राखण्याचे अवहान
एकीकडे बाजारपेठ सुरु होत असताना शहरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा पुन्हा रेड झोनकडे तर वाटचाल करत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  त्यामुळे आता नांदेडकरांनी स्वतःची खबरदारी घेणे अत्यावश्‍यक झाले आहे. बाजारात गर्दीच्या ठिकाणी समांतर अंतर राखुन व तोंडाला मास्क बांधुन नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 


नांदेड कोरोना मिटर
- बाधित व्यक्तींची एकूण संख्या १८२
- १२६ जणांना घरी सोडले
- ५५ जणांवरउपचार सुरू
- ८ बाधीतांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Latest Marathi News Live Update : पुढील तीन ते चार दिवस शरद पवार घरीच आराम करणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT