file Photo
file Photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात कोरोना २३ हजार पार, शुक्रवारी ४५ कोरोनाबाधितांची भर, एकाचा मृत्यू 

शिवचरण वावळे

नांदेड - दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. १९) प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार ४५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३० कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सोबतच उपचारादरम्यान एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना २३ हजार पार गेला आहे. 

शुक्रवारी ७४९ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सातशे जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ४५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २३ हजार ३३ एवढी झाली असून, यातील २१ हजार ९३५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्हाभरात २९५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून, यामधील ११ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवारी श्रीनगर नांदेड येथील पुरुष (वय ८०) या बाधित रुग्णांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ५९२ इतकी झाली आहे. 

३० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी 

शुक्रवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय सहा, महापालिकेतंर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १८, माहूर एक, खासगी रुग्णालय पाच असे ३० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारी बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात - ३८, हदगाव - एक, हिंगोली - एक, धर्माबाद - एक, नायगाव- एक, देगलूर - एक, अर्धापूर - एक, माहूर - एक असे ४५ बाधित आढळले. 

२९५ बाधितांवर औषधोपचार सुरु 

सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालय २५, जिल्हा शासकीय रुग्णालय - २६, किनवट -१५, हदगाव - दोन, देगलूर - दोन, नांदेड महापालिका अंतर्गत गृहविलगीकरणात १६३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण २२, खासगी रुग्णालय ४० असे जिल्हाभरात २९५ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. 

नांदेड कोरोना मीटर ः

एकुण पॉझिटिव्ह - २३ हजार ३३ 
एकूण बरे - २१ हजार ९३५ 
एकुण मृत्यू - ५९२ 
शुक्रवारी पॉझिटिव्ह - ४५ 
शुक्रवारी बरे - ३० 
शुक्रवारी मृत्यू - एक 
प्रलंबित स्वॅब - ३९५ 
उपचार सुरु -२९५ 
अतिगंभीर -११ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT