file photo 
नांदेड

कोरोना, अतिवृष्टी व आर्थिक अडचणीतही दसरा उत्सवाची धामधूम 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दसरा (विजयादशमी) या सणाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय महत्त्व आहे. अश्विन शुद्ध तिथीला दसरा सण साजरा केला जातो. नांदेड शहरात नवा मोंढा, सिडको आणि गाडीपुरा भागात रावण दहन कार्यक्रम असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आले आहेत. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सण आर्थिक अडचणीत साजरा करावा लागत आहे.

विजयाचे प्रतीक असलेल्या या सणाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. दुर्गा नवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो. म्हणून याला नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. रामाचा पूर्वज रघु या अध्यादेशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले, नंतर तो एका पर्णकुटीत राहिला कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजन आणि प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी.

लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत 

या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले आहे. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली. आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला. तो याच दिवशी दसऱ्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना भाऊ असतात मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत.

या दिवशी सीमोल्लंघन. शमीपूजन. अपराजितापूजन. शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात

घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली. हा सण एक कृषी लोकोत्सव म्हणून साजरा होत असे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात. दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी सीमोल्लंघन. शमीपूजन. अपराजितापूजन. शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात. शमीची नाही पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वहातात आणि इष्टमित्रांना देतात सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे आहेत असेच संकेत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT