nanded news
nanded news 
नांदेड

Video-कोरोना : रोगप्रतिकारक शक्ती वाढविणेच एकमेव उपाय

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विषाणूला हरविण्यासाठी फुफ्फुसांना अधिक मजबूत करणे व रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे हा एकमेवच उपाय आहे. ही आरोग्यविषयक जागरुकता लाॅकडाउनमध्ये नागरिकांमध्ये प्रबळपणे पाहावयास मिळत आहे. त्यासाठी घरोघरी आता योग, व्यायाम, प्राणायाम व सकस आहार यावर अधिक भर देण्यात येत आहे.

कोविड-१९ या विषाणूने जगाला हादरवून सोडले आहे. राज्यातही प्रकोप वाढत आहे. कोरोना विषाणूवर विशिष्ट असे औषध वा लस नाही. रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या व्यक्तींवर हा विषाणू लगेच हल्ला चढवतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांद्वारे दिला जात आहे. साहजिकच प्रत्येकजण हेल्थ काॅन्शन्स बनला असून कोरोनाला लढा देण्यासाठी जीवनशैलीत बदल करीत आहे. श्वसन संस्था अर्थात फुफ्फुसे अधिक बळकट करण्यासाठी योग, प्राणायाम तर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

घराच्या टेरेसवर पावलांची गती वाढली
नांदेड शहरात अनेक योग वर्ग आहेत. योग, प्राणायाम, व्यायाम, ध्यानधारणा करणारे साधक आहेत. लाॅकडाउनमुळे हे वर्ग आता बंद झालेले आहेत. तसेच एकत्रित उद्यान, पीपल्स कॉलेजचे मैदान शिवाय विमानतळ रोडवर नियमित योगा करणाऱ्यांचीही संख्या लॉकडाउनमुळे कमी झाली.  त्याऐवजी आता घरोघरी प्रत्येक जण आयसोलेटेड योगाची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणत आहेत. कुठे घराच्या मोकळ्या अंगणात, हवेशीर गच्चीवर, तर कुठे घराच्या खोलीत योगासनांना नियमितता आली आहे. मॉर्निंग वॉक बंद झाल्याने घराच्या टेरेसवर पावलांची गती वाढली आहे. 

कोरोनाला हटविण्यासाठीचे उपाय
कोरोना विषाणूचा घशात व नाकात पहिले तीन दिवस मुक्काम असतो. त्याला हटविण्यासाठी षटकर्म महत्त्वपूर्ण आहे. नाकासाठी जलनीती, सूत्रनिती, रबर नीती, तैलनीती उपयुक्त आहे. तैलनीती ही योगक्रिया कुणालाही शक्य आहे. तसेच घशासाठी वस्त्र धौती, दंड धौती, वमन, प्राणायामात उज्जायी, भ्रामरी, कपालभाती, अनुलोम-विलोम, अग्निसार क्रिया, सिंहासन उपयोगी आहेत. 

योगाभ्यास ठरतोय उपयुक्त
कोरोनावर मात करण्यासाठी शारीरिक प्रतिकारशक्ती तसेच मनोबल आवश्यक आहे. त्यासाठी प्राणायाम हा रामबाण उपाय आहे. खरेतर लाॅकडाउन हा कसोटीचा कालावधी आहे. घरात राहून सर्वांना सांभाळणे व मन प्रसन्न ठेवणे यासाठी योगाभ्यास अतिशय उपयुक्त असा ठरत आहे.
-जयश्री देशपांडे (गृहिणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT