Corona  Sakal
नांदेड

नांदेडला कोरोना रुग्ण वाढले

गुरुवारी ३६ बाधित; १३७ जणांवर उपचार सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नवीन वर्षापासून (New Year) कोरोना (corona)रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. गुरुवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या ९२८ अहवालापैकी ३६ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात दोन रुग्ण बरे झाल्याने त्यास सुटी देण्यात आली. सध्या १३७ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी पाच बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ६८२ एवढी झाली असून यातील ८७ हजार ८९० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढ्यावर स्थिर आहे. गुरुवारी नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात १४, नांदेड ग्रामीण एक, मुदखेड सात, नायगाव एक, बिलोली एक, माहूर एक, किनवट चार, कंधार एक, हिंगोली तीन, परभणी एक, चंद्रपूर एक, पुणे एक असे मिळून ३६ जणांचे अहवाल बाधित आले आहेत.

सध्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सात, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील १०८, नांदेड वाघाळा महापालिकेच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयात दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणातील १५ तर खासगी रुग्णालयातील पाच असे एकूण १३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित ९० हजार ६८२

  • एकूण बरे ८७ हजार ८९०

  • एकूण मृत्यू दोन हजार ६५५

  • गुरुवारी बाधित ३६

  • गुरुवारी बरे दोन

  • गुरुवारी मृत्यू शून्य

  • उपचार सुरु १३७

  • गंभीर रुग्ण पाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Spain vs Belgium : स्पेन १६ वर्षानंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत; मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल, बेल्जियमचे आव्हान संपुष्टात

Maharashtra Off-Budget Debt : महसुली तूट वाढली, महाराष्ट्रावर २८ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर; कॅगचा गंभीर इशारा

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT