file photo 
नांदेड

कोरोना अपडेट - नांदेडला एकाचा मृत्यू, तर सहा पॉझिटिव्ह

अभय कुळकजाईकर

नांदेड - सोमवारी (ता. २९) रात्री एका ५३ वर्षीय पुरुष (रा. बिग बझारजवळ, नवीन कौठा) असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या अहवालात चार, तर नंतरच्या अहवालात दोन, असे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७३ झाली आहे. त्याचबरोबर सोमवारी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या चार जणांमध्ये देगलूर नाका येथील एक पुरुष (वय ५५), नांदेडच्या नवीन कौठा येथील एक पुरुष (वय ५३), बाफना परिसरातील एक महिला (वय ६०) आणि मुखेड येथील एक पुरुष (वय ५५) यांचा समावेश आहे. नंतर आलेल्या अहवालात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात एक छत्रपती चौक येथील पुरुष (वय ५७) आणि एक शिवाजीनगर येथील महिला (वय ३२) यांचा समावेश आहे. त्यापैकी नवीन कौठा बिग बाजारजवळील ५३ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तो शनिवारी (ता. २७) रुग्णालयात दाखल झाला होता आणि त्याचा सोमवारी (ता. २९) मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृत्यूची संख्या १७ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

२८१ जण झाले कोरोनामुक्त
दरम्यान, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोमवारी सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८१ एवढी झाली आहे. तसेच सोमवारी (ता. २९) ११७ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल मंगळवारी (ता. ३०) सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.

७५ रुग्णांवर उपचार सुरु
दाखल ७५ रुग्णांपैकी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ रुग्ण, पंजाब भवन कोविड केअर सेंटरला ४४ रुग्ण, मुखेड कोविड केअर सेंटरला एक, देगलूर कोविड केअर सेंटरला एक रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच सात रुग्ण औरंगाबादला आणि एक रुग्ण सोलापूरला संदर्भित करण्यात आला आहे.

सहा जणांची प्रकृती गंभीर
सध्या ७५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्याच दोन महिला (वय ५० व ५५) आणि चार पुरुष (वय ३८,४२, ६७ आणि ७५) यांचा समावेश आहे.

जिल्ह्याची कोरोनाविषयी संक्षिप्त माहिती

  • सर्वेक्षण - एक लाख ४६ हजार ६८१
  • घेतलेले स्वॅब- सहा हजार ३३५
  • निगेटिव्ह स्वॅब- पाच हजार ४६९
  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- सहा
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - ३७३
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या - तीन
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - निरंक
  • मृत्यू संख्या - १७
  • रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - २८१
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ७५
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ११७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT