fail photo  
नांदेड

कोरोना : ग्रामिण नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल, कोणते? ते वाचाच  

सकाळवृत्तसेवा

नांदेड : कारोना महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. कोविड-१९चे गांभिर्य राखून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून चित्ररथाद्वारे जागृती करण्यात येत आहे. ग्रामीण नागरीकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून आवश्यक साधनांसाठी तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या सोळा १६ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नागरिकांना दहा हजार ५०० मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
 
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची वाढती संख्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करताना प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेकडून ग्रामीण नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्ठिने साधन उपलब्धतेसह जागृतीसाठी तरतुद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपाध्यक्षा तथा अरोग्य सभापती पदमा सतपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य समिती मार्फत जिल्हाभरात चित्ररथाद्वारे कोविड-१९ विषयी जागृती करण्यात येत आहे. 

विविध उपाय योजनांच्या आधारे कारोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक अरोग्य केंद्रस्तरावर रुग्ण, नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. शासन निर्देशानुसार जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणे मार्फत जिल्ह्यातील महिला बचत गटांना १० हजार ५०० मास्क तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तालुक्यातील लोकसंख्येच्या निकशानुसार प्रती तालुका एक हजार ते एक हजार ५०० मास्क प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरीत करण्यात आले. त्यानुसार नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर मास्क वाटप करण्यात आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना गावपातळीवर कोरोना टास्क फोर्स व दक्षता समिती मार्फत क्वारंटाईन करण्यात येत आहे. 

याशिवाय आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आदी कोरोना वॉरिअर्समार्फत नागरिकांच्या सातत्याने तपासण्या करण्यात येत आहेत. घरी येणाऱ्या प्रत्येक कोरोना वॉरिअर्स यांना खरी माहिती देवून स्वत: सह इतरांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. गावपातळीवर तपासणीद्वारे काही लक्षणे अढळूण आल्यास रुग्णास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येत आहे. 

स्वच्छतेची काळजी घ्यावी
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सर्व घटकातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये त्याच बरोबर मार्गदर्शक सुचनांचे पालन करून गरज असल्यासच बाहेर पडावे, सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करावे, वारंवार साबणाने हात धुवावेत, आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. 
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

SCROLL FOR NEXT