file photo 
नांदेड

कोरोना : नांदेडमध्ये ‘त्या’ महिलेचाही मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सेलू येथील एक पंचावन्न वर्षीय महिला विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी (ता.२९ एप्रिल २०२०) दाखल झाली होती. तिच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असताना गुरुवारी (ता.३०) रात्री १०.३० वाजता त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

२०१९ पासून औरंगाबाद येथे उपचार
ही महिला २०१९ पासून औरंगाबाद येथे उपचार घेत होती. परंतु सोमवारी (ता.२७ एप्रिल २०२०) सकाळी साडेचारच्या सुमारास ती महिला खासगी वाहनाने सेलूतील घरी दाखल झाली. मंगळवारी (ता.२८ एप्रिल २०२०) सकाळी साडे दहा वाजता परत औषधोपचार करण्यासाठी महिलेला परभणी येथे नेले होते. तेथेही तिच्यावर उपचार झाले नसल्याने तिला नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. येथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन तपासणी केली असता बुधवारी (ता.२९) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

दरम्यान पीरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचा सेकंड रिपोर्ट बुधवारी (ता.२९ एप्रिल) निगेटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण लवकरच कोरोनामुक्त होईल, असे वाटत असतानाच त्याचा गुरुवारी (ता.३० एप्रिल) दुपारी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coal Scam : कोळसा घोटाळा प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!, तब्बल 100 कोटींपेक्षाही अधिकची मालमत्ता जप्त

KDMC: ठाकरे गटाचे ‘नॉट रिचेबल’ असलेले 3 नगरसेवकांची कोकण भवनात नोंदणी, केडीएमसीत नवे राजकीय वळण

Tarique Rahman : तारिक रहमान - डार्क प्रिन्स, भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास, मृत्यूदंडाची शिक्षा, लंडनला पलायन अन् आता बांगलादेशचे संभाव्य पंतप्रधान!

T20 World Cup : यूएईचा थरारक विजय अन् अफगाणिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप जवळपास निश्चित! ड गटात मोठी उलथापालथ

Nagpur crime : नागपूरचं समाजस्वास्थ बिघडलं; गुन्हेगारीत प्रचंड वाढ; ४३ टक्क्यांनी वाढल्या खूनाच्या घटना

SCROLL FOR NEXT