corona.jpg 
नांदेड

अखेर देगलूर तालुक्याला कोरोनाचा पहिला ‘धक्का’

अनिल कदम


देगलूर, (जि. नांदेड) ः भेंडेगाव तालुका मुखेड येथील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने वास्तव्य केलेल्या हमदापूर तालुका देगलूर येथील त्याचे सासू-सासरे व इतर तीन जणांना व सहप्रवासी राहिलेल्या अंतापूर येथील चार जणांना प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच ‘आयटीआय’मध्ये क्वांरनटाइन केले होते. बुधवारी (ता.तीन) आमदापूर येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने आमदापूर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असून पूर्ण गाव सील केले आहे.


प्रमुख मार्गावर बॅरिकेट्स
खबरदारी म्हणून देगलूर शहरासह तालुक्यात सतर्कतेचे आदेश सर्व विभागांना प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. प्रत्येक गाव स्तरावरील शासकीय कर्मचारी व संबंधित विभागाचे प्रमुख यांनी तेथील नागरिकांशी संपर्क ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, बाधित पॉझिटिव्ह महिला रुग्णास मुखेड येथील कोविड रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. आमदापूर येथील गावकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासूनच सतर्कता बाळगायला सुरवात केली होती. पुन्हा बुधवारी (ता. तीन) महिलेचा अहवाल प्राप्त होताच गावात प्रमुख मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.

गुरुवारपासून (ता. चार) गावात दोन आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन पुढील १४ दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे व दररोज गावात निर्जंतुकीकरणची फवारणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली. गावकऱ्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून त्यांना गावस्तरावर धान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.


मोटारसायकलस्वार, ऑटोचालक अद्याप फरारच
भेंडेगाव (ता. मुखेड) येथील बाधित रुग्णाला मोटारसायकलवरून आमदापूर येथे आणणारा युवक व अंतापूर येथील त्या चार जणांसह बाधित रुग्णांची प्रवासी वाहतूक करणारा ऑटोचालक, असे दोन जण वाहक ठरण्याची शक्यता असून ते सध्या फरार असले तरी त्यांना ताब्यात घेऊन क्वांरटाइन करण्याचे मोठे काम प्रशासनाला यापुढे करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ready Reckoner Rates Unchanged : घर, जमीन घेणे महाग होणार नाही; रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय

Parbhani News: शेणखताची ट्रॉली झाली साडेतीन हजाराला!; पशुधन घटल्याने दरात वाढ; खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Pune News: पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा निर्णय समन्वयातून घेणार: ॲड. राजेंद्र उमाप, १३ एप्रिलला अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल!

मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! २ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा

Latest Marathi News Live Update : १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विदर्भात तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT