नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग छपाट्याने पसरत आहे.शुक्रवारी (ता.२८) घेण्यात आलेल्या स्वॅबचा शनिवारी (ता.२९) अहवाल प्राप्त झाला. यात २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच १७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादरम्यान तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. शनिवारच्या अहवालात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा अकडा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
शुक्रवारी आरटीपीसीआर व ॲन्टीजन टेस्ट किट द्वारे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी एक हजार ३५३ जणांचे अहवाल आले असून आरटीपीसीआरच्या माध्यमातून - ९० आणि ॲन्टीजन टेस्ट किट द्वारे-१७९ असे मिळून २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या सहा हजार १२४ वर जाऊन पोहचली आहे. शनिवारी २४ तासात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महावीर सोसायटी नांदेड येथील पुरुष (वय ४८), जिल्हा रुग्णालयातील जूना लोहा येथील महिला (वय ७५) व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देगलूर नाका येथील पुरुष (वय ६७) या तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी तिघांचा मृत्यू
तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील -३२, जिल्हा रुग्णालयातील- दोन, पंजाब भवन कोविड सेंटर येथील- ११५, हदगाव- चार, नायगाव- पाच, मुदखेड- दोन, धर्माबाद-११ या कोविड सेंटर सह खासगी रुग्णालयातील सात असे १७८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने शनिवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत चार हजार २४० जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.
हेही वाचा- नांदेड - प्रवेश घ्यायचा असेलतर विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी घ्या, महाविद्यालयांची शक्कल
या भागात आढळुन आले रुग्ण ः
नांदेड वाघाळा शहर- ९५
नांदेड ग्रामीण- सात
अर्धापूर- दोन
हदगाव-तीन
कंधार-१०
उमरी-१५
नायगाव-११
भोकर-दोन
बिलोली-१८
देगलूर-१६
किनवट-पाच
मुखेड-२५
धर्माबाद-२५
मुदखेड-चार
लोहा-१८
परभणी- पाच
हिंगोली-तीन
निझामाबाद-एक
पुणे-एक
यवतमाळ- दोन
असे २६९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना मीटर-
एकूण पॉझिटिव्ह ः सहा हजार १२४
प्रकृती गंभीर - १७९
शनिवारी १७८ रुग्णांना बरे
शनिवारी पॉझिटिव्ह-२६९
शनिवारी मृत्यू- तीन
आतापर्यंत डिस्चार्ज- चार हजार २४०
सध्या उपचार सुरू- एक हजार ६२७
शनिवारपर्यंत २५७ मृत्यू,
पैकी २१४ नांदेड जिल्ह्यातील.
शनिवारी २७४ अहवाल प्रलंबित
गंभीर-१७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.