soyabean.jpg
soyabean.jpg 
नांदेड

खरिपात कापूस लागवड घटणार.....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासुन सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. २०१९ मध्ये दाेन लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित केली अाहे. यामुळे नगदी पीक म्हणुन शेतकरी कपाशी ऐवजी सोयाबीनला पसंती देत असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात सात लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

कॉटन बेल्ट नामशेष होण्याच्या मार्गावर
मराठवाड्यात सर्वाधीक कपाशीची लागवड होणारा जिल्हा म्हणुन नांदेडची ओळख होती. नांदेड येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कापुस संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी संशोधीत झालेली ‘नांदेड -४४’ या कपाशीच्या वानाला देशात लौकीक मिळाला होता. या नंतर कपाशीत ‘बिटी’ तंत्रज्ञान विकशीत झाल्याने उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होईल असे वाटत असतांना अलिकडच्या काळात बिटीवर कीड-रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, गुलाबी बोंडअळीचा अतिरेक तसेच बाजारातील अस्थीर भाव यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वळला आहे. 

चार वर्षापासून कपाशीत घट
नांदेड जिल्ह्यात २०१५ - १६ मध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७२ हजार हेक्टर होते. त्यावेळी प्रत्यक्षात पेरणी दोन लाख ७७ हजार हेक्टरवर झाली होती. यानंतर २०१६ - १७ मध्ये सर्वसाधारण पेरणी क्षेत्रात वाढ होवून तीन लाख हेक्टरवर पोचली. त्यावर्षीही पेरणीत वाढ हाेवुन तीन लाख ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली. २०१७ - १८ मध्ये तीन लाख १७ हजार तर २०१८ - १९ मध्ये तब्बल तीन लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर २०१९ - २० मध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा तीन लाख ७० हजार ३७२ हेक्टरवर झाली होती. 

सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
आगामी खरीप हंगामात तीन लाख ९५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी, होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील कपाशीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र तीन लाख २३ हजार हेक्टर असताना यंदा दोन लाख तीन हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र सात लाख ७० हजार ३२१ आहे. कृषी विभागाने आगामी खरीप हंगामात सात लाख ९६ हजार सहाशे हेक्टरवर पेेेेरणी प्रस्तावीत केली आहे.

आगामी खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र
(क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक..........सर्वसाधारण क्षेत्र......प्रस्तावित क्षेत्र
सोयाबीन........१,९९,०८९.........३,९५,०००
कपाशी..........३,२३,७५४.........२,०३,०००
तूर...............५९,७१३............६९,८००
उडीद............२९,५२०............३७,०००
खरीप ज्वारी.....३२,८४५............५५,५००
मुग..............२६,४५१.............३२,०००
इतर पिके........२,६०८..............०४,३००
एकूण............७,७०,३२१.......७,९६,६००

पेरणीपूर्व कामे आटोपून घ्यावीत
आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे आटोपून घ्यावीत. अधिकृत कृषी सेवा केंद्रातून पावती घेवून बियाणे खरेदी करावे. काही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.
- रविशंकर चलवदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT