Nanded Corona Updates 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे वाढले प्रमाण

शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना रुग्ण संख्येचा (Corona) आलेख कधी कमी तर कधी जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. शनिवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या एक हजार ४९२ अहवालांपैकी तीन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ९० हजार ७१७ एवढी झाली आहे. यातील ८८ हजार १३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील (Nanded) कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७.१ टक्का झाले आहे. आजच्या घडीला ४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. शनिवारी दिवसभरात एकाही गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६६१ एवढी स्थिर आहे. शनिवारी बाधितांमध्ये देगलूर (Deglur) - एक, किनवट (Kinwat)- एक व अर्धापूर (Ardhapur) - एक असे एकूण तीन जण बाधित आढळले आहेत.

शनिवारी जिल्ह्यातील सहा कोरोना बाधीत रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. यात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - एक व महापालिका अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण- पाच अशा एकूण सहा बाधितांचा समावेश आहे. सध्या ४३ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकूण बाधित - ९० हजार ७१७

एकूण बरे - ८८ हजार १३

एकूण मृत्यू - दोन हजार ६६१

शनिवारी बाधित - तीन

शनिवारी बरे - सहा

शनिवारी मृत्यू - शून्य

उपचार सुरु - ४३

अतिगंभीर प्रकृती - दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram Maharaj Palkhi : उद्योगनगरी भक्तिमय! संत तुकाराम महाराज पालखीचे शहरात स्वागत

Flood Alert: भीमाशंकर-आहुपे पट्ट्यात मुसळधार पावसाने घोडनदी तुफानी; शिरूर शहरातील कोल्हापूर पद्धतीचे २७ बंधारे ओव्हरफ्लो

Saath Chal : पिंपरीत ‘जलसंवर्धन’ वारी; ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांचा ‘साथ चल’ उपक्रम

Junnar Heavy Rains: जुन्नरच्या आदिवासी पट्ट्यात मुसळधार पावसाचा कहर; रस्ते, पूल जलमय, शेतपिकांचे मोठे नुकसान

Mumbai News : फुले, फुगे अन् 'I Love You'... 'सुहागरात एक्स्प्रेस'चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा सवाल, 'ही परवानगी कुणी दिली?'

SCROLL FOR NEXT