महावितरण वाईबाजार 
नांदेड

महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की; वाईबाजार उपकेंद्रातील घटना

मंगळवारी (ता.15) रात्री वाईबाजार येथील आठवडी बाजार येथील रोहीत्रावरील एक फेज गेल्यामुळे रात्री आठ वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लाईट का गेली असा जाब विचारत वाईबाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील कार्यालयात येऊन टेबलावरील कागदपत्रे फाडत उपस्थित कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना काल (ता.16) घडली. याप्रकरणी धक्काबुक्की करणारे वीजग्राहक सुरज खोडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (ता.15) रात्री वाईबाजार येथील आठवडी बाजार येथील रोहीत्रावरील एक फेज गेल्यामुळे रात्री आठ वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सुरज खोडके या वीजग्राहकांने लाईट का गेली असे म्हणत कनिष्ठ अभियंता सुरेशसिंग राठोड यांना मोबाईलवर शिवीगाळ केली तसेच उपकेंद्रातील बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यासही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामादरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली

कर्मचारी फ्युज टाकायला गेला आहे, थोड्यावेळात वीजपुरवठा सुरु होईल असे समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी (ता.16) वाईबाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील कार्यायात येवून सुरज खोडके याने तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेले कनिष्ठ अभियंता सुरेशसिंग राठोड व त्यांचे सहकारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचबरोबर कागदपत्रे फाडत खुर्च्या व टेबलाची नासधुस करत शासकीय कामात दहशत निर्माण करुन अडथळा निर्माण केला.

झाल्या प्रकाराबाबत सिंदखेड पोलिस ठाण्यात शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या सुरज खोडके याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT