दोन जणांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे लंपास
दोन जणांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे लंपास sakal
नांदेड

दोन जणांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे लंपास

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : इलेक्ट्राॅनिक माध्यमाचा वापर करून बॅंक खात्यातून ऑनलाईन दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी वजिराबाद आणि मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापालिका परिसरात अनिल वसंत जोशी (रा. कुंभारटेकडी, होळी) थांबले होते.

नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला. एटीएम कार्डचे संरक्षण विमा बंद आहे, असे सांगून मोबाईलचा वापर केल्याने ओटीपी नंबर मागितला. ओटीपी क्रमांक मिळताच समोरच्या व्यक्तीने अनिल जोशी यांच्या खात्यातून ६७ हजार १६५ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. खात्यातून ही रक्क वजा होताच अनिल जोशी यांनी वजिराबाद पोलिस ठाणे गाठून संबंधित बॅंकेशी संपर्क केला. चौकशीअंती १८ फेब्रुवारीच्या वजीराबाद पोलिस ठाण्यात अनिल जोशी यांच्या फिर्यादीवरून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक श्री. निकम तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत मुखेड येथील तेलीपेठ गल्ली भागात राहणाऱ्या उषा रवींद्र संबुटवाड यांनाही मी बॅंकेतून बोलत आहे, असे सांगून त्यांच्याही खात्यातील २० हजार रुपये ऑनलाईन काढून फसवणूक झाली आहे. ही घटना २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मुखेड येथे घडली होती. याप्रकरणी तब्बल तीन वर्षांनी मुखेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री. गोबाडे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT