mahur mahur
नांदेड

कोरोनामुळे यंदाही दत्तप्रभुंची प्रसिद्ध परिक्रमा यात्रा रद्द

श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहुरगडतर्फे नारळीपौर्णिमा, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी परिक्रमा यात्रेचे आयोजन केले जाते

साजीद खान

श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहुरगडतर्फे नारळीपौर्णिमा, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी परिक्रमा यात्रेचे आयोजन केले जाते

माहूर (नांदेड): जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथील दत्तात्रय प्रभूंची परिक्रमा यात्रा यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सोबतच इतरही वार्षिक कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती (ता.१७) रोजी पत्र निर्गमित करून देण्यात आली आहे.

श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहुरगडतर्फे नारळीपौर्णिमा, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी परिक्रमा यात्रेचे आयोजन केले जाते. या परिक्रमा यात्रेत लाखोच्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. मागील वर्षी संपूर्ण देशात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भाव कारणाने महाराष्ट्र शासनाने अशा स्वरूपाच्या यात्रा, सार्वजनिक उत्सवाच्या आयोजनावर बंदी घातली आहे. त्या कारणामुळे मंदिर प्रशासनाने यावर्षीची परिक्रमा यात्रा रद्द केली आहे.

भाविकांनी घरी राहूनच धार्मिक कार्य पार पाडावे अशी लेखी सूचना निर्गमित करण्यात आली. सदर सूचनेची दखल घेऊन भाविकांनी मंदिरावर व गडावर येण्याचे टाळावे.अशी विनंती संस्थेच्या विश्वस्त मंडळाने जाहीरपणे व्यक्त केली आहे. एकंदरीत लाखोंच्या संख्येने परिक्रमेसाठी येणाऱ्या भाविकांचा गतवर्षीपासून हिरमोड होत असून मागील वर्षी देखील बंदी असताना सुद्धा पायरीचे दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविकांनी गर्दी केली होती हे उल्लेखनीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ElNino2026: एल निनो डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीजवळ ;सर्वाधिक तापमानाची शक्यता; जूनमध्ये न्यूट्रल स्थितीचा ‘सीपीसी’चा अंदाज

14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 14 नोव्हेंबर 2026

Yearly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसे असेल तुमचे हे वर्ष..? ग्रहमान : ऑक्टोबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT