CM Eknath Shinde 
नांदेड

Dhangar Community : धनगर समाजाच्या मागण्यांना मुख्यमंत्री शिंदेकडून प्रतिसाद

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

किनवट : धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी तसेच अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या मागणीसाठी खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समिती तसेच जय मल्हार युवा मंचच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे विधानभवनात नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती कुंडगीर यांनी दिली. राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. समाजाच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लागाव्यात यासाठी राज्यसभेचे खासदार महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समिती व जय मल्हार युवा मंचच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे विधान भवनात भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी नगर, असे नाव देण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद बनसोड, बीड जिल्हाध्यक्ष बाबुलाल ढोरमारे यांच्यासह जय मल्हार युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav ने मला खूप मेसेज केले होते...' बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; नेमकं काय म्हणाली?

Air India Express Offers : नववर्षाची विमान प्रवाशांसाठी मोठी ऑफर! Air India Express ची Pay-Day Sale सुरू; तिकिटांवर बंपर सवलत

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आखाड्यात तृतीयपंथी उमेदवार

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

Pune Municipal Election : ''माघार घेतली म्हणून मंत्री निवडून आला, शब्द देऊन फडणवीसांनी दगा दिला''; भाजप कार्यकर्ता आता अजितदादांच्या पक्षाकडून लढणार

SCROLL FOR NEXT