NND08KJP02.jpg 
नांदेड

एप्रिलमध्ये २३ हजार ४५० टन धान्याचे वितरण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्‍ह्यात एक हजार ९९३ रास्‍तभाव दुकानदार असून या सर्व रास्‍तभाव दुकानदारांना सर्व योजनेचे एप्रिल महिन्यांसाठी २४ हजार २०६ मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. त्यापैकी जिल्ह्यात २३ हजार ४५०.८९ मेट्रीक टन धान्याचे वितरण ता. ३० एप्रिल अखेर करण्यात आले आहे.

नियमित अन्‍नधान्‍य वितरण   
ता. ३० एप्रिल २०२० अखेर पर्यंत, माहे एप्रिल २०२० या महिन्याचे नियमित अन्‍नधान्‍य वितरण नांदेड जिल्‍ह्यासाठी एक हजार ९९३ रास्‍तभाव दुकानदारांकडून अंत्‍योदय योजनेचे दोन हजार ७५९.९० टन, प्राधान्‍य कुटुंब योजनेचे आठ हजार ६२४.६७ टन व केशरी (शेतकरी) योजनेचे एक हजार ९५३.२२ टन असे एकूण १३ हजार ३३७.७८ मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्‍यांना वितरण करण्‍यात आले आहे. 

पाच लाख ६७ हजार शिधापत्रिकाधारकांना धान्‍य
सर्व योजनेचे एकूण शिधापत्रिका पाच लाख ८६ हजार ३७६ पैकी पाच लाख ६७ हजार ९३८ (९६.८५ टक्के) शिधापत्रिकाधारकांना धान्‍य वितरीत करण्‍यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गंत एकुण शिधापत्रिका चार लाख ९० हजार ४९९ पैकी चार लाख ५३ हजार ५७९ (९२.४७ टक्के) शिधापत्रिकाधारकांना १० हजार ११३.११ टन धान्‍य वितरीत करण्‍यात आले आहे.

‘अन्‍नसुरक्षे’त समाविष्‍ट नसलेल्यांना धान्य वाटप
कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्‍ट होऊ न शकलेल्‍या व एपील (केशरी) योजनेत समाविष्‍ट न झालेल्या एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे २०२० साठी एकूण ८३ हजार ६३८ शिधापत्रिका धारकांनापैकी एक हजार ५७९ शिधापत्रिका धारकांना २१.४१ टन गहू व १४.२८ टन तांदूळ धान्‍य वितरीत करण्‍यात आले आहे. प्रतिकिलो आठ रुपये दराने गहू व प्रति किलो रुपये १२ दराने तांदूळ या सवलतींच्‍या दराने प्रतिमाह प्रती व्‍यक्‍ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ या प्रमाणे पाच किलो अन्‍नधान्‍य वितरीत करण्‍यात येत आहे.

पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही

ई-पॉसद्वारे धान्‍य वितरणाचा नियमितपणे आढावा घेऊन कोणताही पात्र लाभार्थी अन्‍नधान्‍यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍यात येत आहे. 
शरद मंडलिक,
जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड.    
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT