file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी २८२ कोटींचे सोळा तालुक्यांना वितरण

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या टप्यात २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीचे मागणीच्या पन्नास टक्क्यानुसार वितरण मंगळवारी (ता. १०) सर्वच सोळा तालुक्यांना करण्यात आले. हा निधी संबधीत तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा तडाखा दिला. त्यामुळे पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील जिरायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल यंत्रणेने पाठविला होता. यात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी एकूण ३८४ कोटी ८० लाख १२ हजार १८८ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. 

५६५ कोटी १३ लाख रुपये अपेक्षीत निधी                                                 परंतु शासनाच्या सुधारीत दरानुसार जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ५६५ कोटी १३ लाख रुपये अपेक्षीत निधी लागणार आहे. मंगळवारी (ता. १०) नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने २८४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी नांदेड जिल्ह्याला उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा प्रशासनाने हा निधी लगेच सर्व सोळा तालुक्यांना त्यांच्या मागणीच्या पन्नास टक्क्यानुसार वितरीत केला आहे. यामुळे हा निधी संबधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.

तालुकानिहाय वितरीत केलेला निधी
नांदेड - दहा कोटी ३३ लाख, अर्धापूर - आठ कोटी ५१ लाख, कंधार - २० कोटी ७६ लाख, लोहा - २६ कोटी ३६ लाख, बिलोली - १६ कोटी २० लाख, नायगाव - १९ कोटी १९ लाख, देगलूर - २२ कोटी ४१ लाख, मुखेड - २४ कोटी ४० लाख, भोकर - १९ कोटी ५७ लाख, मुदखेड - सात कोटी २९ लाख, धर्माबाद - दहा कोटी २३ लाख, उमरी - १४ कोटी ३७ लाख, हदगाव - ३२ कोटी ८१ लाख, हिमायतनगर - १५ कोटी ९९ लाख, किनवट - २४ कोटी २३ लाख, माहूर - नऊ कोटी ८३ लाख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: गर्भपातासाठी पतीची परवानगी नको! उच्च न्यायालयाचे एकाच दिवशी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Vote Counting Center Declare : पुण्यातील मतमोजणी केंद्रे जाहीर! तुमच्या भागातील मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार वाचा सविस्तर

Nagpur News: नागपूरात बोगस बांधकाम कामगार नोंदणी; दलालांचे धाबे दणाणले, नागपूर, वर्धा जिल्ह्यात कारवाई!

Shoumika Mahadik : शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार की नाही, ४ शब्दात कंडका पाडला...

CM Devendra Fadnavis : मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना सवाल

SCROLL FOR NEXT