जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  
नांदेड

नांदेडला शनिवारी दुकाने सुरु ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात दर शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी रहावी, यासाठी आता प्रत्येक शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने अटी व शर्तींच्या अधिन राहून चालू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग शहर आणि जिल्ह्यात वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी यापूर्वी शनिवारी आणि रविवारी बाजारपेठेत आणि दुकानामध्ये वाढती गर्दी लक्षात घेता शनिवारी आणि रविवारी दोन दिवस दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच दुकाने चालू ठेवावीत असे सांगितले होते. त्याच बदल करुन सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. 

शनिवारी दुकाने, आस्थापना चालू राहणार
नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने शनिवार व रविवार वगळून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्यात मुभा देण्यात आली होती. परंतू शनिवार व रविवारी दुकाने, आस्थापना बंद असल्यामुळे दर शुक्रवारी तसेच सोमवारी बाजारात, दुकानात पुन्हा नागरिकांची गर्दी वाढत होती. उपाययोजनेचा एक भाग म्हणून सदर गर्दी कमी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी दुकाने, आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे मुभा दिली आहे.  

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
तसेच कोव्हिड - १९ च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या सूचना व निर्देशाचे जो कोणी पालन करणार नाही अशा व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT