IMG
IMG 
नांदेड

Video; मदिरालय जानेको घरसे चलता है पिनेवाला...

राजन मंगरुळकर

नांदेड ः ‘मदिरालय जानेको घरसे चलता है पिनेवाला... किस पथ पे जाउ न संमजस वो है भूलाबाला... अलग अलग पथ बतलाती सब, पर मै ये बतलाता हूं,राह पडक तू एक चलाचल पा जाएगा मधूशाला...’ या हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’मधील ओळी आज तंतोतंत खऱ्या ठरत असल्याचे चित्र नांदेड शहरात पहावयास मिळाले. त्याला कारणही असेच आहे. लॉकडाउनमुळे मागील ५५ दिवसांपासून बंद असलेली दारुची दुकाने शनिवारी उघडली आणि सकाळपासूनच शौकीनांनी दारु दुकानासमोर शिस्तीत रांग लावत एकच प्याला पिण्यासाठी गर्दी केली होती. 

मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात दारुची विक्री सुरु करण्याविषयी प्रशासनाने यंत्रणा रानबविली. त्यानूसार शनिवारी (ता.१६) शहरातील सर्व वाईन शॉप, बिअरची दुकाने सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत उघडली होती. यासाठी ज्यांना दारुची खरेदी करायची आहे, त्यांच्याकडे दारु खरेदीचा परवाना असणे आवश्‍यक होते तसेच त्यांनी आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे होते. त्यांनाच घरपोच दारुची सुविधा मिळाली. यात विदेशी मद्य, बिअरचा समावेश होता.  शनिवारी शहरातील अनेक वाईन शॉपवर खरेदीसाठी ग्राहकांनी शिस्तीत रांगा लावल्याचे दिसून आले. एकीकडे नोंदणी केलेल्यांना घरपोच दारुची सुविधा मिळाली तर ज्यांच्याकडे परवाने नव्हते अशांची मात्र, दारु खरेदीसाठी तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.  

कंटेटमेंट झोन वगळून विक्री 
शासनाने लॉकडाउन कालावधीमध्ये अनुज्ञप्त्या शनिवारी (ता.१६) मे पासून सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत आणि घाऊक, ठोक मद्यविक्री अनुज्ञप्त्या (नमुना एफएल एक व सीएल-दोन) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. घाऊक, ठोक मद्य विक्री अनुज्ञप्त्यांबाबत  ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार  चालू करण्यात येतील. शहरी भागातील कंटेटमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. 

अशी मिळणार सेवा
मद्य वितरीत करणारे डिलीव्हरी बॉय यांनी पिवळ्या रंगाचा  ‘लिकर डिलिव्हरी बॉय’  असा उल्लेख असलेला टी-शर्ट घालूनच मद्य वितरीत करणे बंधनकारक आहे. आपणास सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेतच मद्याची घरपोच विक्री करता येईल. परवानाधारकाकडून मद्याची किंमत ही रोख स्वरुपात अथवा क्रेडिट, डेबिट कार्ड स्वॅप मशिनच्या माध्यमातून डिलिव्हरी बॉयने स्वीकारावी. अनुज्ञप्तीधारकास मद्याची घरपोच सेवा देताना मद्य छापील किरकोळ विक्री किंमतीने (एमआरपी) विक्री करणे बंधनकारक आहे. घरपोच मद्यसेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क, सेवा शुल्क आकारण्यात येऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT