Nanded News 
नांदेड

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकसेनेला दिलेला शब्द पाळला

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना महामारीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत संभ्रम होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेने १५ सप्टेंबर रोजी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन वास्तव मांडले. त्यानुसार गुरुवारी (ता.२९) शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

कोरोना काळात सर्वच आस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत २४ जून, २२‌ जुलै तसेच १७ आॅगस्ट रोजी स्वतंत्र परिपत्रक काढूनही संभ्रम कायम होता. शिक्षणविभागातील अधिकारी अनेक तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या सूचना देत होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन तमाम शिक्षकांना मानसिक त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आॅनलाईन शिक्षण पद्धतीचा समग्र आढावा घेण्यासाठी १५ सप्टेबर रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नांदेड येथे आल्या होत्या.

दरम्यान शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षकांमध्ये कशाप्रकारे संभ्रम होतो, याविषयी चर्चा केली होती. तसेच त्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले होते. त्यानुसार निवेदनाची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने २९ आॅक्टोबर रोजीच्या परिपत्रकान्वये सर्वच आस्थापनांच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये होणारा संभ्रम काहीप्रमाणात दूर होण्यास मदत होईल.

असे आहेत निर्देश
राज्यातील सर्वच आस्थापनांच्या शाळांत आता यापुढे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून आॅनलाईन, आॅफलाईन तसेच दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी शाळेतील एकूण कार्यरत पदसंख्येच्या ५०% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ही संख्या आॅनलाईन, आॅफलाईन, दूरस्थ तसेच कार्यालयीन कामकाजासाठी योग्य ती काळजी व उपाययोजना करुन उपस्थित राहणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची आहे.

पुढील आदेशापर्यंत तोंडी आदेश देवू नये
सरकारने लाॅकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविला आहे. दिवाळीनंतरच शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा सरकारचा मानस असून तोपर्यंत सदरील परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून संबंधित क्षेत्रीय  अधिकारी यांच्याकडून शिक्षक बांधवांना नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कोणतेही तोंडी आदेश देऊ नये.
- संतोष अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT