File Photo 
नांदेड

पगारीसाठी २७० कोटींवर कर्मचाऱ्यांची नजर 

शिवचरण वावळे

नांदेड : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विविध सवलतींच्या प्रतीपूर्तीच्या थकबाकी रकमेतून महाराष्ट्रा राज्य एसटी महामंडळाला २७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रकमेतून फक्त एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, अशी परिवहन मंत्री यांच्याकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तसेच एसटी सेवा व मालवाहतूक काही प्रमाणात सुरू झालेली असून, कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पगार अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन मूलभूत गरजा भागविण्यासाठी वेतनाची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच देय असलेल्या (ता. सात) तारखेस वेतन अदा न झाल्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पगार नसल्याने अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे.

कंत्राटदारांचे हित जोपासले नसते तर...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळतील खासगी शिवशाही कंत्राटदारांनी बिलांची रक्कम मिळावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी केली आहे. ब्रिक्स कंपनीने महामंडळासोबत झालेल्या करारानुसार कामे केलेली नाहीत. किंबहुना कराराचा भंग केला आहे.  तरी सुद्धा मे महन्यात ब्रिक्स इंडिया प्रा. लि. कंपनीला राज्य परिवहन महामंडळाने करोडो रुपये दिले आहेत. सदर कंपनीने महामंडळाकडे बिले सादर करून रकमेची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवशाही, ब्रिक्स (स्वच्छता) यासह कोणत्याही खासगी कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत, तसेच मागील काळात खासगी कंत्राटदारांचे हित जोपासले नसते तर आज महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनावर अवलंबून राहावे लागले नसल्याची खंत सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्यासह अनेक कर्मचारी यांनी व्यक्त केली. 

वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी​

महाराष्ट्र शासनाने विविध प्रवास सवलत मूल्यांच्या थकबाकींच्या प्रतिपूर्तीपोटी २९७ कोटी रुपयांपैकी एसटी महामंडळाला २७० कोटी रुपये दिलेल्या रकमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे मे, जून २०२० या महिन्यांचे एकाच टप्प्यात संपूर्ण वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी परिवहन मंत्री, मा. परिवहन राज्यमंत्री, मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे  महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस  यांनी केल्याचे सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT