labour sakal
नांदेड

Nanded News : जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतीत रोहयो अंतर्गत ३०७८१ मजुरांना मिळाले काम

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतीत विविध यंत्रणेचे दोन हजार ८८० कामे सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतीत विविध यंत्रणेचे दोन हजार ८८० कामे सुरु आहेत. या कामावर ३२ हजार ४८१ मजूर काम करीत आहेत. यात सर्वाधिक ग्रामपंचायत यंत्रणेच्या कामावर तीस हजार ७८१ मजूर काम करत असल्याची माहिती रोहयो कक्षातून देण्यात आली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) जिल्ह्यात ग्रामपंचायत, कृषी विभाग, वन विभाग, सामाजीक वनीकरण विभागाकडून मजूरांच्या मार्फत काम सुरु आहेत. मागील दोन महिन्यापासून यात वाढ झाली आहे. दरम्यानच्या काळात गटविकास अधीकाऱ्यांच्या संपामुळे कामावर परिणाम झाला होता. सध्या संप मिटल्यामुळे पुन्हा एकदा कामांना गती आहे.

जिल्ह्यातील गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींची दोन हजार ८८१ कामे सुरू आहेत. येथे ३० हजार ७८१ लोकांना रोजगार देण्यात आला आहे. तर कृषी विभागाची ११ कामे सुरु आहेत. यावर १५८ मजूर काम करत आहेत. वन विभागाची ६६ कामे सुरु आहेत. या कामावर एक हजार २७२ मजूर काम करत आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागात १६ कामे सुरु आहेत. यावर २७० मजूर काम करीत आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन हजार ८८१ कामावर ३२ हजार ४८१ मजूर काम करत आहेत, अशी माहिती रोहयोच्या सूत्राने दिली. सध्या जिल्ह्यात पादंण रस्ते, सिंचन विहीरी, शेततळे, रोपवाटीका आदी कामे सुरु आहेत.

लोहा तालुक्यात सर्वाधिक मजूर

जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर सर्वांत जास्त लोहा तालुक्यात मजूर कामावर आहेत. या तालुक्यामध्ये ३४५ कामे सुरू आहेत. यावर चार हजार १४२ लोकांना रोजगार देण्यात आला आहे. या शिवाय हदगाव तालुक्यात ३३६ कामे सुरू असून तीन हजार ९१५ तर कंधार तालुक्यात २३० कामावर तीन हजार १०२ मजूर काम करत आहेत.

देगलूर तालुक्यात १५३ कामावर तीन हजार ७४, माहूर तालुक्यात १९७ कामांवर एक हजार ९३९, हिमायतनगर तालुक्यात १०६ कामांवर एक हजार ३८०, नायगाव तालुक्यात ३१८ कामावर दोन हजार ६९४, मुखेड तालुक्यात १४३ कामावर एक हजार १६, भोकर तालुक्यात ५९ कामावर ४५२, धर्माबाद तालुक्यात ५५ कामावर एक हजार ९९, अर्धापूर तालुक्यात ११८ कामावर ५२७, नांदेड तालुक्यात शंभर कामावर एक हजार ३५०, मुदखेड तालुक्यात १४३ कामावर एक हजार १६, उमरी तालुक्यात १०९ कामावर एक हजार ३२५, बिलोली तालुक्यात ९७ कामावर एक हजार आठ तर किनवट तालुक्यात ३१४ कामावर दोन हजार ९७९ मजूर कामावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT