नांदेड

सर्वांना मिळणार 'या' आरोग्य योजनेचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्वच कुटुंबाना उपचारासाठी मोफत लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाची लागण नसलेल्या इतर आजाराच्या सर्व लोकांना या निर्णयामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.   

जनआरोग्य योजना संलग्नीकरण
सुधारीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरुपात ता. एक एप्रिलपासून अंमलात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केली जाते.

१२० उपचारांचा लाभ घेता येणार 
शासकीय व पालिका रुग्णालयाचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या १३४ उपचारांपैकी १२० उपचारांचा लाभ यापुढे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अंगिकृत खाजगी रुग्णालयात ता. ३१ जुलै पर्यंत घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत काही किरकोळ, मोठे उपचार व तपासण्या समाविष्ट नाहीत असे उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएसच्या दरानुसार (NABH / NABL ) उपलब्ध करुन देण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत ९९६ आजारावरील उपचाराची सोय असून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एक हजार २०९ आजारावर उपचार केले जातात.

प्रत्येकाला जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार
राज्यातील जवळपास ८५ टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. ता. २३ मे रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील आता प्रत्येक व्यक्तीला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत योजनेचा लाभार्थी नसलेल्याना सुद्धा आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. दूरध्वनीद्वारे टोल फ्री नंबर १५५३८८ किंवा १८०० २३३ २२०० या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटी जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मायांनी केले आहे.  


प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्यास मुदतवाढ
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील महाडिबीटी पोर्टल प्रणालीमधील महाविद्यालयाच्या लॉगीनवर विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी शनिवार ता. सहा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

लाभासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ अनुदानित, विनाअनुदानित, व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली अंतर्गत www.mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

लाभाची रक्कम थेट  खात्यात
अनुसुचीत जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या / महाविद्यालयाच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात येते. महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर छानणी करुन आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगीनमधून समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर फॉरवर्ड करण्यात यावे.

बुधवारपर्यंत पाठवावे कागदपत्र 
विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज (हार्ड कॉपी) व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयास छाननी प्रक्रियेसाठी बुधवार ता. १० जून पूर्वी सादर करावेत. कॉलेज लॉगिनवर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शनिवार ता. सहा जूनपर्यंत समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड न केल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस मावळदकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT