file photo
file photo 
नांदेड

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत अन्न धान्य वितरणास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या पात्र लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतील लाभार्थ्यांस अन्न धान्य वितरणास शुक्रवारपर्यंत (ता. दहा जुलै) मुदतवाढ दिली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांनी अद्याप रास्त भाव दुकानातून अन्न धान्य उचल केली नाही, त्यांनी ता. दहा जुलैपर्यंत रास्त भाव दुकानातून अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता, विना शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांना मे व जून मध्ये आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेंतर्गत प्रति व्यक्ती प्रति महा पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब प्रति महा एक किलो अख्खा हरभरा यानुसार मे व जूनचे एकत्रित प्रतिव्यक्ती दहा किलो तांदुळ व प्रति कुटूंब दोन किलो अख्खा चना लाभार्थ्यांना वाटप सुरु आहे.

विशेष बाब म्हणून निर्णय
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (प्राधान्य कुटुंब व अंत्योदय) योजनेतील लाभार्थ्यांना जूनसाठी प्रती सदस्य प्रतिमाह पाच किलो तांदूळ मोफत व मे व जूनची प्रती कुटुंब तुरदाळ किंवा चनादाळ प्रती महा एक किलो याप्रमाणे दोन महिन्याची दोन किलो दाळ मोफत जूनमध्ये वितरीत करण्यात येत होती. या दोन्ही योजनेतील काही लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत अन्नधान्य उचल न केल्याने शासनाने विशेष बाब म्हणून ता. दहा जुलैपर्यंत अन्न धान्य प्राप्त करुन घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी नमूद केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २१.२२ टक्के पाऊस 
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. तीन) सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या गेल्या २४ तासात सरासरी ५.६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण ९०.८६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १८९.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१.२२ टक्के एवढा पाऊस झाला आहे. २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - नांदेड - एक, मुदखेड - ७.३३, अर्धापूर - १.३३, भोकर - तीन, उमरी - निरंक, कंधार - दोन, लोहा - ३.५०, किनवट - १३.८६, माहूर - १९.७५, हदगाव - १८.१४, हिमायतनगर - नऊ, देगलूर - ०.३३, बिलोली - निरंक, धर्माबाद - ४.३३, नायगाव - निरंक, मुखेड - ७.२९ आज अखेर पावसाची सरासरी १८९.१६ असून चालू वर्षाचा एकूण पाऊस ३०२६.५६ मिलीमीटर आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

Rinku Rajguru: तुम्हाला लेकीसाठी कसा मुलगा हवा? रिंकू राजगुरूचे वडील म्हणतात- माझी मुलगी जिथे काम करते...

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT