file photo 
नांदेड

निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी- पाशा पटेल

बंडू माटाळकर

निवघाबाजार (जिल्हा नांदेड) : कोरोनासारखा भयंकर रोग येण्याचे कारण म्हणजे वृक्षतोड. झपाट्यने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे माणसाला अनेक रोगाना बळी पडावे लागत आहे. निसर्गाचं समतोल अबाधीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यानी बांबूची लागवड करावी असे आवाहान कोहळी (ता. हदगांव) येथे बुधवारी (ता. ९) रोजी पाशा पटेल यानी केले आहे. यावेळी माजी खासदार शिवाजी माने, चितंगराव कदम, बाबुराव कदम, बालासाहेब कदम, कृषी अधिकारी श्री. रणविर, विवेक देशमुख, लक्ष्मणराव कदम आदी उपस्थित होते.

येथून जवळच असलेल्या कोहळी (ता. हदगांव) येथे शेवंतामाता फार्मर प्रोडूसर कंपनी आयोजीत बांबू लागवड मार्गदर्शन शिबीर आयोजीत कार्यक्रमात पाशा पटेल बोलत होते. बोलताना पाशा पटेल म्हणाले की, बहूपयोगी व बदलत्या वातावरणात बांबू व इतर फळबाग शेतकऱ्याना फायद्याची ठरु शकेल,२५ ते ३० टक्के क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याचे आवाहन केले. इतर झाडं केवळ कमी प्रमाणात ऑक्सीजन देतात, तर बांबू हे पिक वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतो तर ३० टक्यापर्यंत ऑक्सिजन सोडतो. 

ऑक्सिजन माणसाला जिवन जगताना फार अमुल्य वरदान ठरतो. यामुळे वातावरणातील समतोल स्थिर ठेवतो. एक रोप लावले तर त्याचे पन्नास ते साठ झाडे निर्माण होऊ शकतात. शिवाय त्याला खर्च झिरो बजेट असल्याने त्याचा शेतकऱ्याना १००% फायदा होऊन उत्पन्नात मोठी भर होऊ शकते. एका एकरला तिन ते चार लाखाचे उत्पन्न मिळू शकते. खर्च काही करण्याची गरज नसून ना निदंन,ना खुरपण ना खत पाणी? बांबूपासून तयार करण्यात आलेल्या ट्रे, कोळपाट बेलन, टोपरी, ब्रश इत्यादी वस्तु बनवल्याने ते प्रत्यक्ष उपस्थीताना दाखविले. यावेळी गजानन शिंदे धानोरा, कबीरदास पाटील, दत्तराव सुकळकर, दिपक पाटील, निळू पाटील, गुलाबराव पाटील, संभाराव लांडगे इत्यादी उपस्थीत होते.सुत्रसंचालन सुदर्शन जाधव मनुलेकर यानी तर आभार बाबुराव कदम यानी मानले.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

SCROLL FOR NEXT