file photo
file photo 
नांदेड

रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. विपीन इटनकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020- 21 या रब्बी हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम ता. 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी ता. 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार, इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री. गिरी, तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते.

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

नांदेड : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मंगळवार 27 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी लॉकडाऊननंतर उद्भभवलेला बेरोजगारीचा प्रश्न व उपाय याविषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत  करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीतजास्त युवक-युवतींनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहभाग घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे लागेल

लॉकडाऊननंतर उद्भभवलेला बेरोजगारीचा प्रश्न व उपाय याविषयावर शुभंकरोती फाऊंडेशन तथा मार्गदर्शकउद्योगिनी समुहाचे संस्थापक किरण चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे लागेल. यासाठी https://meet.google.com/vwn-qumy-uam या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर  इन्स्टॉल करून घ्यावे. आपण गुगल मीटॲप Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माइक म्युट mice muteबंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक अन् म्युट  unmute/सुरु करून विचारावे व लगेच  माईक म्युट mute/बंद करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा कौशल्य विकास. रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड  02462-251674 येथे  संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT