file photo 
नांदेड

मुळ गावी जाण्यासाठी माहिती ऑनलाईन भरा- जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लॉकाडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्या व्यक्तींना परत आपल्या मुळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची आवश्यक ती माहिती ऑनलाईन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6WqrggEuZOxh2bdjdOdMDC0Ix47ByWxQ0_9hJO2sGbUoT3w/viewform?usp=sf_link

पुढील लिंकवर क्लिक करुन आवश्यक

तसेच भारताच्या व महाराष्ट्रराज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना नांदेड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSed_VJMqAm5aTWZ-t7nFf8Gp8mvvAEc9AibJrzbydMZ0Tq63w/viewform?usp=sf_link

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

संबंधितांनी सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा, राज्यातील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-249279, 02462- 235077 ईमेल collectornanded1@gmail.com संपर्क करा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प 

जलाशयाच्या दोन्ही तिरावरील बागायतदारांनी, नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करावा.  
अवैध पाणी उपसा केल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार.  

नांदेड : शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयाच्या दोन्ही तीरावरील बागायतदारांनी नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करावा व पाण्याचा नाश, अपव्यय टाळावा. विद्युत पुरवठा बंद कालावधीत अनाधिकृत विद्युत जोडणी होत असल्यास व अवैध पाणी उपसा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. बंद कालावधीत मोटार बंद ठेवून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेश

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयावरील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 30 एप्रिल रोजी घेण्यात आली. या बैठकीतील निर्देशानुसार शेतीचा पाणीवापर काही प्रमाणात मर्यादीत करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार 1 मे 2020 ते 10 मे 2020 पर्यंत या भागातील सिंगल फेज विद्युत पुरवठा वेळापत्रकाप्रमाणे दररोज सुरु राहिल व शेतीपंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा एक दिवसआड सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर सोमवार 11 मे 2020 रोजी झालेल्या पाणी वापराची आढावा बैठक घेऊन विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा  निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT