मुदखेड जळीत प्रकरण 
नांदेड

मजुरीवर उभा केलेला निवारा आगीने हिरावल्याने संसार उघड्यावर

आनंदा व त्यांचा परिवार मजूरी कामासाठी आंबेगाव शिवारातील दिलीपराव कोरे यांच्या शेतात कामासाठी राहत होते.

गंगाधार डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील बारडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बारडवाडी मजूर आनंदा तानाजी पुंजरवाड यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागल्याने घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रोजंदारीवर संसाराचा गाडा हाकत कशीबशी निवाऱ्याची सोय केली होती. परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचे चालेना म्हणल्या गत रोजंदार आनंदा तानाजी पुंजरवाड यांचा संसार घर जळाल्याने उघड्यावर आला. त्यांच्या परिवारापुढे सध्या संकट कोसळल्याने पुन्हा घर कसे उभारावे हा प्रश्न निर्माण झाला असल्याने जळालेल्या घर उभारणीला मदतीची गरज आहे.

आनंदा व त्यांचा परिवार मजूरी कामासाठी आंबेगाव शिवारातील दिलीपराव कोरे यांच्या शेतात कामासाठी राहत होते. ता. २४ मध्यरात्री अचानक घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य व वर्षाचा अन्नधान्य घेवून ठेवलेला साठा घरावरील सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे.

हेही वाचा - अनेक जण सत्यता न पडताळता थेट उपाय करतात.

सुदैवाने आनंदा हा परिवारासह कामासाठी शेतावरच थांबला असल्याने घरात कोणीच नसल्याने जीवीत हानी टळली आहे. आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. अंदाजे या जळीत घटनेत एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पुंजरवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तलाठी अंजली बार्शीकर यांनी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी माजी उपसरपंच दिलीपराव कोरे, कल्पना देशमुख, विजय देशमुख, माधव पावडे, कैलास देशमुख आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

Marathwada News: मराठवाड्यात कृषी पर्यटनाला चालना ; १५० शेतकऱ्यांची नोंदणी, ११६ कृषी पर्यटन केंद्रांची पाहणी

SCROLL FOR NEXT