file photo 
नांदेड

एक कोटी 85 लाखांचा भरणा करत नांदेड परिमंडळातील पाच हजार 50 कृषिपंप थकबाकी मुक्त

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महा कृषी ऊर्जा अभियान 2020 च्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळा अंतर्गत असलेल्या नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयातील तीन लाख चार हजार 851 कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत चार हजार 198 कोटी 76 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण एक हजार 703 कोटी 59 लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत.

या कृषी ग्राहकांनी उरलेल्या दोन 495 कोटी 17 लाखांच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे एक हजार 247 कोटी 58 लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकित वीजबिलही कोरे होणार आहे.

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे. या धोरणानुसार नांदेड परिमंडळातील पाच हजार 50 कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी 85 लाख रूपयांचा भरणा करत थकबाकी मुक्त झाले आहेत. यामध्ये नांदेड जिल्हयातील एक 166 कृषिपंप ग्राहकांनी 70 लाख 97 हजार तर परभणी जिल्हयातील एक हजार 726 कृषिपंप ग्राहकांनी 50 लाख 32 हजार रूपये त्याचबरोबर हिंगोली जिल्हयातील दोन हजार 158 कृषिपंप ग्राहकांनी 63 लाख 90 हजार रूपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच पाच वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ करून व्याज हे 18 टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या- त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी तसेच वसूल झालेल्या बिलातील 66 टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार असल्याने महावितरणतर्फे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांशी थेट संवाद साधून अभियानाची माहिती दिली जात आहे. तसेच वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

कृषिपंप ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम हा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकल्यावर या अभियानातील सवलत व भरावयाच्या रकमेसह इतर तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संबंधित कार्यालयात संपर्क साधावा व वीजबिल थकबाकीमुक्तीच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilanga Municipal Election : आपल्याच पक्षाच्या उमेवाराला मतदान करून घेण्यासाठी रस्सीखेच; “निलंगा नगरपालिकेत चुरशीची लढत!

Agriculture News : कमी पाण्यात भरघोस उत्पन्न! मका-ज्वारीऐवजी जळगावच्या शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती

Ichakaranji Election : धूळ खात पडलेल्या पोलिस चौक्या पुन्हा कार्यरत; निवडणूक काळात इचलकरंजीत कडेकोट बंदोबस्त

T20 World Cup 2026 : लकी चार्म...! भारत टी-२० वर्ल्ड कप जिंकणार, कारण संघात 'तो' खेळाडू परतला; २०२४ चा वर्ल्ड कप जरा आठवा...

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सत्तेचे नवीन समीकरण! शहरात भाजपला, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला झुकते माप

SCROLL FOR NEXT