फोटो 
नांदेड

उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करा- न्या. धोळकीया

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा न्यायीक विभागातील निम्या न्यायालयांचे मर्यादित कामकाज सोमवार (ता. आठ) पासून सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत व निम्या न्यायालयात दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच यावेळेत दोन सत्रात सुरु होणार आहे. कोवीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाबाबत व न्यायालयात प्रवेशाबाबत विहित केलेले निर्देश विचारात घेऊन नांदेड येथील न्यायालय संकुलात प्रवेश व न्यायालयीन कामकाजाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी निर्देश दिले आहेत.

या निर्देशानुसार नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड व दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर नांदेड यांच्याकडे दाखल होणारी सर्व प्रकरणे (दोषारोपपत्र वगळून) कामकाजाच्या दिवशी फक्त सकाळी साडेदहा ते दीड यावेळामध्ये निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये दाखल करुन घेण्यात येतील. तसेच एक वकील एकावेळी दहापेक्षा जास्त प्रकरणे दाखल करु शकणार नाही. 

युक्तीवाद लेखी स्वरुपात सादर करावा

जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणातील शपथपत्रांची पडताळणी कामकाजाच्या दिवशी सकाळी साडेदहा ते दीड यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये केली जाईल. संबंधीत वकीलांनी आपआपली प्रकरणे निर्दिष्ट जागी उपलब्ध करुन दिलेल्या बॉक्समध्ये टाकावीत. कोणत्याही वकीलास कामकाजावेळी न्यायालयातील संचिका प्रत्यक्ष हाताळता येणार नाही. सर्व वकीलांनी शक्यतोवर आपआपल्या प्रकरणातील युक्तीवाद लेखी स्वरुपात सादर करावा.

कनिष्ठ वकिलास न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश नाही

न्यायालयातील प्रवेश व संचाराबाबतचे निर्देश, न्यायालयातील दैनिक बोर्डवर असणाऱ्या व पक्षकाराच्या अनुपस्थितीत घेता येणाऱ्या फक्त युक्तीवाद व अंतरिम युक्तीवाद असलेल्या प्रकरणात वकिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या समोरच्या कार्यालयामधून न्यायालयातील प्रवेशाबाबतचे प्रवेशपत्र, पास अदा केल्या जातील. ज्या वकिलांकडे प्रवेशपत्र आहे, त्यानांच न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाईल. जेष्ठ वकिलांच्या सोबत त्यांच्या सहकारी कनिष्ठ वकीलास न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही पक्षकारास न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही.

सर्वाची थर्मल तापमापक संयंत्राद्वारे तपासणी 

न्यायालय परिसरात प्रवेश करतांना सर्वाची थर्मल तापमापक संयंत्राद्वारे तपासणी केली जाईल. ३८ अंश सेल्शीअसपेक्षा अधीक तापमान असलेल्या किंवा सर्दी, पडसे इत्यादी कोवीड-19 ची अन्य लक्षणे असलेल्या किंवा घोषित केलेल्या प्रतिबंधक क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीस न्यायालयात किंवा न्यायालयाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

अभिवक्ता संघाची सर्व दालने बंद ठेवण्यात येतील

सर्व विधीज्ञ आणि पक्षकारांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोवीड-19 पासून बचाव करण्याच्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन न्यायालयातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT